ETV Bharat / state

पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ अटक

तहसील कार्यालयातील अधिकारी तक्रारदाराच्या वाहनांचे पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. त्यानंतर याच पनवेल तहसील कार्यालयातील कारकून राखमाजी चवणे यांनी तक्रारदाराकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागितली होती.

पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ अटक
author img

By

Published : Nov 17, 2019, 9:04 PM IST

रायगड - पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लोकसभा निवडणुकीत वाहन वापरल्याबद्दल मंजूर भाडे अदा करण्यासाठी या कारकुनाने लाच मागितली होती. राखमाजी शेषराव चवणे असे या लाचखोर कारकूनाचे नाव असून तो पनवेल तहसील कार्यालयात कनिष्ट लिपिक या पदावर काम करत होता.

पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ अटक

हेही वाचा - महाशिवआघाडी आली तरी पनवेल महापालिकेच्या चाव्या भाजपकडेच!

तक्रारदाराने लोकसभा निवडणुकीत आपले वाहन भाडे तत्त्वावर दिले होते. लोकसभा निवडणुका होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही भाड्याची ठरलेली रक्कम देण्यास पनवेल तहसील कार्यालय टाळाटाळ करत होते. तक्रारदराने वाहनांचे भाडे घेण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारले. तहसील कार्यालयातील अधिकारी तक्रारदाराच्या वाहनांचे पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. त्यानंतर याच पनवेल तहसील कार्यालयातील कारकून राखमाजी चवणे यांनी तक्रारदाराकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा - पनवेलमध्ये 'मैं भी नेहरू' म्हणत बाल दिवस उत्साहात साजरा

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाखाली बळीराम पाटील, विश्वास गंभीर, निशांत माळी यांनी पनवेल तहसील कार्यालयात सापळा रचला. यावेळी कारकून चवणे याला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे पनवेल तहसील कार्यालयातला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Intro:पनवेल

पनवेल तहसील कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत वाहन वापरल्याबद्दल मंजूर भाडे अदा करण्यासाठी या कारकुनाने लाच मागितली होती. Body:राखमाजी शेषराव चवणे असं या लाच घेणाऱ्या कारकूनाचं नाव आहे. पनवेल तहसील कार्यालयात तो कनिष्ट लिपिक या पदावर काम करीत होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत तक्रारदाराचे वाहन हे भाडे तत्त्वावर वापरण्यात आले होते. लोकसभा निवडणुका होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही भाडे तत्त्वावरील ठरलेली रक्कम देण्यास पनवेल तहसिल कार्यालय टाळाटाळ करीत होते. तक्रारदराने वाहनांचे भाडे घेण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारले. तहसील कार्यालयातील अधिकारी तक्रारदाराच्या वाहनांचे पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. त्यानंतर याच पनवेल तहसील कार्यालयातील कारकून राखमाजी चवणे यांनी तक्रारदाराकडे साडे चार हजार रुपयांची लाच मागितली. Conclusion:याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाखाली बळीराम पाटील, विश्वास गंभीर, निशांत माळी यांनी पनवेल तहसील कार्यालयात सापळा रचला. यावेळी कारकून चवणे याला साडे चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या घटनेमुळे पनवेल तहसील कार्यालयातला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.