ETV Bharat / state

सराईत चोरांकडून 11 लाख किमतीचे 63 मोबाईल जप्त; पनवेल पोलिसांची कारवाई - चोरांकडून 11 लाख किमतीचे 63 मोबाईल जप्त

चोरीला गेलेल्या 11 लाखांच्या मोबाईलचा शोध लावण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून 11 लाखांचे 63 मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चोरांकडून 11 लाख किमतीचे 63 मोबाईल जप्त
author img

By

Published : Nov 14, 2019, 3:01 PM IST

पनवेल - गर्दीचा फायदा उचलून मोबाईल लांबवणार्‍या चोरट्यांची पनवेलमध्ये धुमाकूळ घातला आहे. चोरीला गेलेल्या 11 लाखांच्या मोबाईलचा शोध लावण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून 11 लाखांचे 63 मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

crime news
हस्तगत केलेले मोबाईल्स

हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा

कुंदनकुमार अर्जुन महातो (21) आणि कैला उर्फ आजम जॅको शेख अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक इशान खरोटे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ऑक्टोबरला साध्या वेशेत पनवेलमधील मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर पाळत ठेवली. यावेळी कुंदनकुमार महातो याला मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचा साथीदार आझम जेक्कु शेख याला झारखंड येथून अटक करण्यात आली. पनवेलमधून चोरी केलेले मोबाईल हे दोघेही नेपाळ, बांगलादेश यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी विकत होते.

crime news
सराईत चोरांकडून 11 लाख किमतीचे 63 मोबाईल जप्त; पनवेल पोलिसांची कारवाई

या दोघांनी चोरी केलेले एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचे 63 मोबाईल हे ते सुरतमधल्या भाड्याच्या घरात लपून ठेवले होते. यात आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, एमआय, लेनोवो, मोटोरोला यांसारख्या विविध कंपन्यांचे एकूण 63 मोबाईल आढळून आले. या टोळीत आणखी काही आरोपी साथीदारांचा समावेश आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

Intro:सोबत दोन फोटोज जोडले आहेत
पनवेल

गर्दीचा फायदा उचलून मोबाईल लांबवणार्‍या चोरट्यांची पनवेलमध्ये कमतरता नाही. अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांनी लांबवलेला मोबाईल परत मिळणे कठीणच नव्हे तर मुश्किल बाब....परंतु चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या 11 लाखांच्या मोबाईलचा शोध लावण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून 11 लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहेे.
Body:कुंदनकुमार अर्जुन महातो (21) आणि कैला उर्फ आजम जॅको शेख अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ऑक्टोबरला साध्या वेशेत पनवेल मधल्या मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर पाळत ठेवली. यावेळी कुंदन कुमार महातो याला मोबाईल चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचा साथीदार आझम जेक्कु शेख याला झारखंड येथून अटक करण्यात आली. पनवेल मधून चोरी केलेले मोबाईल हे दोघेही नेपाळ बांगलादेश यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी विकत असत.
Conclusion:या दोघांनी चोरी केलेले एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचे 63 मोबाईल हे ते सुरत मधल्या भाड्याच्या घरात लपून ठेवले होते. यात आयफोन सॅमसंग विवो ओप्पो एमआय लेनोवो मोटरोला यांसारख्या विविध कंपन्यांचे एकूण 63 मोबाईल आढळून आले. या टोळीत आणखी काही आरोपी साथीदारांचा समावेश आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.