रायगड - पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली असुन हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान 17 ऑक्टोबरपर्यत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.
अवेळी पावसाने भातपीक धोक्यात; शेतकरी चिंताग्रस्त - raigad farmer news
पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली असुन हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
![अवेळी पावसाने भातपीक धोक्यात; शेतकरी चिंताग्रस्त Paddy crop in danger in Raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9181719-841-9181719-1602746234306.jpg?imwidth=3840)
रायगडातील भातपीक धोक्यात
रायगड - पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली असुन हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान 17 ऑक्टोबरपर्यत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.
रायगडातील भातपीक धोक्यात
जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भात कापणीला सुरुवात करतात. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीक हे पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच 17 ऑक्टोबरपर्यत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
मराठवाड्यात सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान..
मराठवाड्यात यावेळी पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरवर्षी दुष्काळाने होरपळणारा शेतकरी यंदा अतिवृष्टीमुळे त्रस्त झाला आहे. मराठवाड्यातील कापूस, मका, सोयाबीनसारख्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.