ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत'च्या 'त्या' वृत्ताला विरोधी पक्षनेत्यांचा दुजोरा; दोषींवर कारवाई करण्याची मागणी - निसर्ग चक्रीवादळ नुकसना भरपाई

निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू करण्यात आले. 90 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, नुकसान भरपाईही देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नुकसान भरपाई देताना राजकीय वरदहस्त असलेल्यांना दिली जात आहे.

pravin darekar
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Jun 30, 2020, 10:05 PM IST

रायगड - निसर्ग चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झाले नाही, तसेच अंशतः नुकसान झाले आहे अशानाही नुकसान भरपाई मिळाली. मात्र, आम्हाला कधी मिळणार? असा प्रश्न नुकसानग्रस्तांनी विचारला असल्याची बातमी ईटीव्ही भारतने उजेडात आणली. या बातमीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी चक्क पत्रकार परिषदेत अलिबाग तालुक्यातील नागाव गावातील दोन जणांना अशी नुकसान भरपाई दिल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात भ्रष्ट्राचार करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू करण्यात आले. 90 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, नुकसान भरपाईही देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नुकसान भरपाई देताना राजकीय वरदहस्त असलेल्यांना दिली जात आहे. तसेच ज्यांच्या घराचे अंशतः नुकसान झालेले नागाव येथील एम एन पाटील यांना 1 लाख 40 हजार, हजारे यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे चेक वाटप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दिल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

नागावसारख्या इतर ठिकाणीही असे बोगस अनुदान वाटले असून, याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत. या संकटकाळात असे भ्रष्ट्राचार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असल्याची माहितीही दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहिती देणार आहे. तसेच ज्याचे नुकसान झाले आहे, त्यांनाच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.