रायगड - निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागच्या समुद्रकिनारी आज 3 जून रोजी धडकणार आहे. त्या दृष्टीने तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहेत.
थळबाजार येथील साधारण दीड हजार कोळीबंधव नागरिकांना थळ ग्रामपंचायत इमारत, शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. तर या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 11 हजार 260 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.
अलिबाग - 4 हजार 407
पेण - 87
मुरुड - 2 हजार 407
उरण - 1 हजार 512
पनवेल - 55
श्रीवर्धन - 2 हजार 553
म्हासळा - 239