रायगड - जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे समुद्रही खवळलेला असून अलिबाग समुद्र किनारी लाटांसोबत तेलाचा तवंग किनाऱ्यावर वाहून आला आहे. यामुळे किनाऱ्यावर तवंग साचल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पावसाने जिल्ह्यात मुसळधार सुरुवात केली असल्याने सगळीकडे जलमय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील समुद्रही खवळलेल्या परिस्थितीत आहेत. अलिबाग समुद्र किनारी येणाऱ्या लाटांसोबत तेलाचा तवंग लाटेसोबत तरंगताना दिसत आहे, तर ओहटीच्यावेळी हा तवंग किनाऱ्यावर पसरला असल्याने किनारपट्टीवर काळ्या रंगाचा तवंग पसरला आहे.
समुद्र किनाऱ्यावर आलेले हे तेलमिश्रित तवंग एखाद्या बोटीतून डिझेल सांडून ते किनाऱ्यावर आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्या तरी किनारा हा तेलाच्या काळ्या तवंगाने भरून गेला आहे.