ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका; शेवटच्या दिवशी इतके उमेदवार मैदानात - June Six

जिल्ह्यात 154 ग्रामपंचायतीमध्ये 269 जागांवर सदस्य तर 10 सरपंच जागांवर पोटनिवडणूक होत आहे. 269 जागांसाठी 129 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 140 जागांवर उमेदवारी अर्ज भरले नसल्याने येथील सदस्य पदे रिक्त राहणार आहेत.

रायगड जिल्ह्यात 8 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका; शेवटच्या दिवशी इतके उमेदवार मैदानात
author img

By

Published : Jun 7, 2019, 5:19 PM IST

रायगड - जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतीमध्ये 269 सदस्य व 10 सरपंच पदासाठीची सार्वत्रिक पोटनिवडणूक 23 जूनला आहे. 6 जूनला सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत 8 सरपंच पदासाठी 32 तर 94 सदस्य पदासाठी 266 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पोटनिवडणुकीसाठी 269 जागांवर सदस्य पदासाठी 129 तर 10 सरपंच पदासाठी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

23 जूनला जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी सार्वत्रिक पोटनिवडणूक होत आहे. अलिबाग 2, पेण 1, पनवेल 3, उरण 2 अशा आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामध्ये थेट सरपंच पदासाठी 32 उमेदवारी अर्ज आले आहेत, तर सदस्य पदासाठी 266 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात 154 ग्रामपंचायतीमध्ये 269 जागांवर सदस्य तर 10 सरपंच जागांवर पोटनिवडणूक होत आहे. 269 जागांसाठी 129 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 140 जागांवर उमेदवारी अर्ज भरले नसल्याने येथील सदस्य पदे रिक्त राहणार आहेत.

मुरुड, पेण, उरण, खालापूर, महाड, पोलादपूर या तालुक्यात प्रत्येकी एक तर श्रीवर्धन तालुक्यात 4 अशा 10 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, फक्त मुरुड तालुक्यातील एका सरपंच जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मात्र इतर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीसाठी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे 9 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंच पदे रिक्त राहणार आहेत.

Intro:
8 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 32 तर सदस्य पदासाठी 266 उमेदवारी अर्ज दाखल

पोट निवडणुकीसाठी 269 सदस्य पदासाठी 129 तर 10 सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज

रायगड : जिल्ह्यातील 8 सार्वत्रिक ग्रामपंचायत, 269 सदस्य व 10 सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक 23 जून रोजी होत आहे. 6 जून रोजी सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत 8 सरपंच पदासाठी 32 तर 94 सदस्य पदासाठी 266 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पोटनिवडणुकीसाठी 269 जागांवर सदस्य पदासाठी 129 तर 10 सरपंच पदासाठी केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. Body:23 जून रोजी जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत व सदस्य व सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. अलिबाग 2, पेण 1, पनवेल 3, उरण 2 अशा आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामध्ये थेट सरपंच पदासाठी 32 उमेदवारी अर्ज आले असून सदस्य पदासाठी 266 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात 154 ग्रामपंचायतीमध्ये 269 जागांवर सदस्य तर 10 सरपंच जागांवर पोटनिवडणूक होत आहे. 269 जागांसाठी 129 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 140 जागांवर उमेदवारी अर्ज भरले नसल्याने येथील सदस्य पदे रिक्त राहणार आहेत.Conclusion:मुरुड, पेण, उरण, खालापूर, महाड, पोलादपूर या तालुक्यात प्रत्येकी एक तर श्रीवर्धन तालुक्यात 4 अशा 10 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र फक्त मुरुड तालुक्यातील एका सरपंच जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तर बाकी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीसाठी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे 9 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंच पदे रिक्त राहणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.