ETV Bharat / state

कर्जतमधील आकुर्लेमध्ये उभी राहणार अद्यावत व्यायाम शाळा - अद्यावत व्यायाम शाळा

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी आमदार अनिकेत तटकरेंच्या स्थानिक विकास कार्यक्रम 21-22 माध्यमातून दहा लाखांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून लवकरच आकुर्ले येथे अद्यावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार असल्याने तरुण मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अद्यावत व्यायाम शाळा उभी राहणार
अद्यावत व्यायाम शाळा उभी राहणार
author img

By

Published : May 3, 2021, 3:28 PM IST

रायगड (खालापूर) - कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले गावात अद्यावत व्यायाम शाळा उभारावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून युवकांची होती. याचीच दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी आमदार अनिकेत तटकरेंच्या स्थानिक विकास कार्यक्रम 21-22 माध्यमातून दहा लाखांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून लवकरच आकुर्ले येथे अद्यावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार असल्याने तरुण मंडळीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व तरुण मंडळीनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे आभार मानले आहे.

सुधाकर घारे यांच्या प्रयत्नांना यश
वाढती रोगराई, आजार याला रोखायचे असेल तर शरीर तंदुरुस्त हवे. त्यासाठी नित्यनियमाने व्यायाम हवा. त्यामुळेच आपल्या गावातील तरुणांना हक्काची व्यायाम शाळा हवी, अशी इच्छा येथील तरुणांची होती. ती अखेर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली असून या संदर्भातले पत्र सुधाकर घारे यांनी दिले आहे.

दहा लाखांचा निधी मंजूर
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नंदकुमार लाड, अनिल चव्हाण, सुजित मोरे, मोहन मांडवकर, विनायक काणेकर, संतोष चव्हाण, कुमेश मोरे, प्रकाश म्हापार्ले आदीप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेचे 11 कोच सज्ज; नागपूर महापालिकेकडे हस्तांतरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.