रायगड - 2019 वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2020 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी फुलून गेले होते. 12 वाजण्याच्या ठोक्याला फटाक्यांची आतिषबाजी करून आणि एकमेकाला शुभेच्छा देऊन शहरवासियांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. तसेच आकाशात कागदी कंदीलही सोडण्यात नागरिक दंग झाले होते.
2019 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पर्यटकांसह नागरिकही नववर्षाच्या स्वागताची तयारी करीत होते. हॉटेल, रिसॉर्टवर नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई
जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समुद्र किनारी नववर्ष स्वागतासाठी पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. रात्रीचे 12 वाजल्यानंतर नवीन वर्ष सुरू होताच आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात झाली होती. नागरिकांनी एकमेकांना आलिंगन, हात मिळवून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.