रायगड - पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आज माजी आमदार तथा विद्यमान राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात मोदी सरकारचा तीव्र निषेध केला.
हेही वाचा - अलिबाग तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू
राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नायब तहसीलदार कल्याणी मोहीते यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार तथा युवक रायगड जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हंटले की, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रात आलेले सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावू, असा विश्वास देऊन सत्तेवर आले. मात्र, सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसची दरवाढ केली. ही दरवाढ कमी न केल्यास राज्यात राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड, रा.जि.प. सदस्य नरेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, तालुकाध्यक्ष एच.आर. पाटील, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, भूषण पाटील, पं.स.सदस्य.विश्वनाथ पाटील, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, आदी व्यक्ती उपस्थित होते.
हेही वाचा - 'औषध विक्रेत्यांना लसीकरणात प्राधान्य द्या'