ETV Bharat / state

रायगड : गॅस आणि इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; चुलीवर भाकरी बनवत व्यक्त केला निषेध - गॅस आणि इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधनदरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पिंपळभाट येथील रस्त्याच्याकडेला चूल तयार करून त्यावर तवा ठेवून भाकऱ्या थापल्या.

NCPs agitation against gas and fuel price hike in raigad
रायगड : गॅस आणि इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; चुलीवर भाकरी बनवत व्यक्त केला निषेध
author img

By

Published : Jul 3, 2021, 5:47 PM IST

रायगड - वाढत्या गॅस आणि इंधनदरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पिंपळभाट येथील रस्त्याच्याकडेला चूल तयार करून त्यावर तवा ठेवून भाकऱ्या थापल्या. तसेच केंद्र सरकारने पुन्हा चुलीवर जेवण करण्याची ही वेळ आणली असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला. यादरम्यान, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

प्रतिक्रिया

'महागाईने जनता हवालदिल' -

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदी पार झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडरही हजाराच्यावर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरातील अर्थकारण बदलले आहे. आधीच कोरोनाने जनता हैराण झाली आहे. त्यातच केंद्र सरकारच्या या धोरणामुळे महागाईचा आलेख चढत चालला आहे. त्यामुळे घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने विचारण्यात आला.

चुलीवर भाकऱ्या करून केंद्र सरकारचा निषेध -

केंद्र सरकारच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका हा महिला वर्गाला बसतो. घरातील खर्च भागविताना या महिला वर्गाला काटकसर करावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी अलिबाग शहरातील पिंपळभाट येथे केलेल्या आंदोलनात चुलीवर भाकऱ्या करून केंद्र सरकारचा निषेध केला. भाजप सरकारने महिलांना पुन्हा चुलीवर जेवण बनवण्यास भाग पाडले असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली.

हेही वाचा - राफेल सौदा संशयाच्या भोवऱ्यात; फ्रान्समधील न्यायालय करणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.