ETV Bharat / state

आज महाडमध्ये आघाडीची प्रचारसभा; सुनिल तटकरेंसह अमोल कोल्हेंची उपस्थिती - tatkare

महाड येथील चांदे मैदानावर ही सभा होणार आहे. सुनिल तटकरे यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाडमध्ये आघाडीची प्रचारसभा
author img

By

Published : Mar 18, 2019, 5:29 PM IST

रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचाराला आज सुरुवात होत आहे. महाड येथून त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या सभेला सुनिल तटकरेंसह शिरुर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित असणार आहेत.

महाडमध्ये आघाडीची प्रचारसभा

महाड येथील चांदे मैदानावर ही सभा होणार आहे. सुनिल तटकरे यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. सभेच्या सुरुवातीला रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर, चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन सभेला सुरुवात होईल.

राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, शेकापचे नेते जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेला साधारण १५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहेत.

Intro:महाड मध्ये आज आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

महाडच्या चांदे मैदानावर आघाडीची सभा

अमोल कोल्हे ह्यांची प्रमुख उपस्थिती

रायगड : रायगड लोकसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ आज रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने फोडणार आहेत. यासाठी संभाजी मालिकेतील संभाजी भूमिका निभावणारे अमोल कोल्हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता चांदे मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडीची ही पहिलीच सभा असून अमोल कोल्हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:
लोकसभाचे वारे सर्वत्र घोंघाऊ लागले असून सर्वच पक्षानी प्रचार व सभांचा धडाका सूरू केला आहे, बहुचर्चित रायगड लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या वतीने सुनील तटकरे यांचे नाव पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने कार्यकर्ते व नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभेपुर्वी रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यानंतर चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व मान्यवर सभेच्या ठिकाणी येणार आहेत.Conclusion:राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, रायगडचे उमेदवार सुनील तटकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, शेकाप चे नेते जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेला साधारण 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.