ETV Bharat / state

इंधन दरवाढीविरोधात खालापूरमध्ये राष्ट्रवादचे आंदोलन, मोदी सरकारचा मनमानी कारभार असल्याचा आरोप

आज राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथे आंदोलन करण्यात आले. येथील तहसील कार्यालयाच्या परीसरात शनिवार 3 जुलै रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने केली.

इंधन दरवाढीविरोधात खालापूरमध्ये राष्ट्रवादचे आंदोलन

author img

By

Published : Jul 3, 2021, 9:32 PM IST

रायगड - केंद्र सरकारने सातत्याने इंधनाचे दर वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील खालापूर तालुका व खोपोली शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, हे आंदोलन राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली खालापूर करण्यात आले. येथील तहसील कार्यालयाच्या परीसरात शनिवार 3 जुलै रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने केली.

इंधन दरवाढीविरोधात खालापूरमध्ये राष्ट्रवादचे आंदोलन, यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड

'भाजपने फक्त अच्छे दिनचे स्वप्न दाखवले'

देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विश्वासघात केला आहे, अशी टीकही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. या रोजच्या महागाईने अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच ही रोज होणारी पेट्रोल दरवाढ नागरिकांना त्रासदायक ठरली आहे. पेट्रोल, डिझेल याबरोबर घरगुती गँस, तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामध्ये सामान्य माणूस पुरता मेटाकुटीला आला आहे.

'मोदी सरकारचा मनमानी कारभार'

कोरोनाचा कामगारांसह शेती, उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. येत्या काही दिवसांत आणखी किती दरवाढ होणार यांचा अंदाज बांधणे कठीण आहे. केंद्र सरकारच्या या मनमानी कारभाराचा अनेक जण निषेध व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुका राष्ट्रवादी व खोपोली शहर राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश सरचिटणीस दत्ताजी मसुरकर, जि.प.सदस्य नरेश पाटील, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, तालुकाध्यक्ष एच. आर. पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, उपजिल्हाध्यक्ष शेखर पिंगळे, खोपोली शहर अध्यक्ष मनेश यादव, युवक अध्यक्ष अतुल पाटील, भूषण पाटील, संतोष गुरव, पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, युवा अध्यक्ष गौरव दिसले, रमेश खांडेकर, महिला अध्यक्षा श्वेता मनवे, शहर अध्यक्षा सुर्वणा मोरे, जितू सकपाळ, प्रविण गोपाळे, राजेश पारठे, राजेश देशमुख, राकेश देशमुख, विनोद रजपूत, भास्कर लांडगे, नंदकुमार पाटील, संतोष चिले आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.