ETV Bharat / state

पनवेलमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीच्या रॅलीत फडकला तिरंगा

अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादासंदर्भात लागलेल्या निकालानंतर यंदाच्या ईद सणावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत पारंपरिक पोशाखात आलेल्या तरूणांनी 'हिंदुस्थान जिंदाबाद' चे नारे लावत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवले.

तिरंगा फडकविताना पनवेल नागरिक
author img

By

Published : Nov 11, 2019, 11:06 AM IST

पनवेल- इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा आज पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात जन्मदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टच्या वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तिरंगा फडकल्याने शहरातील ईद आकर्षणाची ठरली.

ईद निमित्त प्रतिक्रिया देताना पनवेल नागरिक

अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादासंदर्भात लागलेल्या निकालानंतर यंदाच्या ईद सणावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत पारंपरिक पोशाखात आलेल्या तरुणांनी 'हिंदुस्थान जिंदाबाद' चे नारे लावत हिंदू-मुस्लीम एकतेच दर्शन घडवले. मुस्लीमबांधवांनी आपल्या घरी दुवा पठण व फातिया पठण केले. त्याचबरोबर, खीर-पुरी व अन्य गोड पदार्थ देखील करण्यात आले. मिरवणुकीत अबालवृद्धांसह हजारो मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टच्यावतीने काढण्यात आलेली ही रॅली पनवेल रेल्वे स्थानकापासून पुढे आझाद नगर-के मॉल, गोदरेज कॉलनी, तक्का गाव परिसरातून होत शेवटी तक्का दर्गा या मार्गावर संपवण्यात आली.

बाबरी मस्जिद आणि राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्व मुस्लीम बांधव आदर करतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. तसेच आम्ही सर्व हिंदू-मुस्लीम भाऊ-भाऊ आहोत. त्यामुळे प्रत्येक सण-उत्सव आम्ही शहरात एकत्रीत साजरे करतो, असेही मुस्लीम बांधव म्हणाले. रॅलीदरम्यान 'हिंदूस्थान झिंदाबाद' म्हणत मुस्लीम बांधवांनी राष्ट्राविषयी प्रेम व्यक्त केले. तसेच रॅलीदरम्यान मुस्लीम बांधवांनी झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव यांसारखे अनेक सामाजिक संदेश देखील देण्यात आले.

रॅलीबाबत मुस्लीम बांधवांनी दिलेल्या शांतता-एकतेच्या संदेशाचे व रॅलीत फडकलेल्या तिरंग्याचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यावेळी जावेद इब्राहिम फकीर मुजावर, सीजान जावेद फकीर मुजावर, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

हेही वाचा- अभिषेक गाडेकर ठरला यंदाचा 'मिस्टर रायगड'

Intro:सोबत व्हिडीओ आणि बाईट जोडली आहे.

पनवेल परिसरात मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक

हिंदुस्थान झिंदाबाद म्हणत मुस्लिम बांधवांनी दिला एकतेचा संदेश.!

पनवेल

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस आज पनवेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टी च्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत तिरंगा फडकल्यानं पनवेलमधली ईद आकर्षणाची ठरली. Body:अयोध्यातील ऐतिहासिक रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादासंदर्भात लागलेल्या निकालानंतर यंदाच्या ईद सणावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पनवेलमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत पारंपरिक पोशाखात आलेल्या तरूणांनी 'हिंदुस्थान जिंदाबाद' चे नारे लावत हिंदू-मुस्लिम एकतेच दर्शन घडवलं. सणानिमित्त मुस्लिमबांधव घरी दुवापठण व फातिया पठण केलं. खीर-पुरी व अन्य गोड पदार्थ करण्यात आले. मिरवणुकीत अबालवृद्धांसह हजारो मुस्लिमबांधव सहभागी झाले. हजरत पीर जमाल शाह तजरी रह तक्का दर्गाह ट्रस्टीच्या वतीने काढण्यात आलेली ही रॅली पनवेल रेल्वे स्थानकापासून पुढे आझाद नगर-के मॉल, गोदरेज कॉलनी, तक्का गाव परिसरातुन काढून शेवटी तक्का दर्गा या मार्गावर संपवण्यात आली.

संपूर्ण देशात बाबरी मस्जिद आणि राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव आदर करतो व आम्हाला निर्णय मान्य आहे, तसेच आम्ही सर्व हिंदू मुस्लिम भाऊ-भाऊ आहोत. त्यामुळे प्रत्येक सण उत्सव आम्ही शहरात एकत्रित साजरे करतो, असेही मुस्लिम बांधव म्हणाले. रॅलीदरम्यान 'हिंदूस्थान झिंदाबाद' म्हणत मुस्लिम बांधवांनी राष्ट्राविषयी प्रेम देखील व्यक्त केले. तसेच या रॅलीदरम्यान मुस्लिम बांधवांनी झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव यांसारखे अनेक सामाजिक संदेश देखील दिले व शांततेच्या मार्गाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.Conclusion:या रॅलीबाबत मुस्लिम बांधवांनी दिलेल्या शांतता-एकतेच्या संदेशाचे व रॅलीत फडकलेल्या तिरंग्याचे पनवेल परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी जावेद इब्राहिम फकीर मुजावर, सीजान जावेद फकीर मुजावर,भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.