ETV Bharat / state

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद, रायगड जिल्ह्यात रात्री संचारबंदी लागू

author img

By

Published : Dec 25, 2020, 1:04 PM IST

रायगड जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माहिती दिली आहे. तसेच कोरोनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊसवर कारवाई केली जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांना सात दिवसांसाठी बंदी केली जाणार आहे.

raigad night curfew started
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

रायगड (अलिबाग) - परदेशातून येणाऱ्या पर्यटचकांनमुळे कोरोनामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माहिती दिली आहे. तसेच कोरोनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊसवर कारवाई केली जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांना सात दिवसांसाठी बंदी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे. मुरुड जंजिरा किल्लाही 25 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यत पर्यटकांसाठी बंद केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत जिल्ह्यात संचारबंदी
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. रायगड जिल्ह्यातही नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकही येऊ लागले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार रायगडातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली जाणार आहे.

समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने पर्यटनाला परवानगी दिली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन याठिकाणच्या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे पर्यटन वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार अजून डोक्यावर लटकलेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल, रिसॉर्टवर होणार कारवाई
नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊसवर पार्ट्याचे आयोजन केले जात आहे. तर जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस आधीच पर्यटकांच्या बुकिंगने हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊस धारकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा जिल्हा प्रशासनाकडून उचलला जाणार आहे. नियम मोडणाऱ्या व्यवसायिकाचे सात दिवसांसाठी बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागताला रिसॉर्ट, हॉटेल, फार्म हाऊसवर धिंगाणा घातल्यास व्यवसायिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 9 दिवस राहणार बंद
मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटकांची संख्या पाहता गर्दी टाळण्याचे नियोजन होत नाही. त्यामुळे मुरुड जंजिरा किल्ला हा पर्यटकांसाठी 25 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यत बंद करण्यात आलेला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

हेही वाचा - गोरेगावच्या हुक्का पार्लरमध्ये पोलिसांचा छापा, सुमारे आठ कोटींचा हुक्का फ्लेवर जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.