ETV Bharat / state

पेण अर्बन बँकेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - खासदार तटकरे

पेण अर्बन बँक व इतर बुडालेल्या सहरकारी बँकांबाबत पाठपुरावा सुरू असून बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली असून कदाचित सोमवारीच (दि. 21 डिसें.) बैठक ठरेल. तसेच फेब्रुवारी होणाऱ्या संसदीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अनुराग ठाकूर यांना भेटून पेण अर्बन बँकेचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे आहे.

निवेदन स्वीकारताना खासदार तटकरे
निवेदन स्वीकारताना खासदार तटकरे
author img

By

Published : Dec 20, 2020, 10:23 PM IST

पेण (रायगड) - खासदार झाल्यामुळे संसदेच्या अधिवेशनात सहकारी बँका बाबत विधेयक मांडण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सहकारी बँक विलनिकरण बाबतीत जशी केंद्र सरकारने भूमिका घेतली, तशीच भूमिका पेण अर्बन बँक व इतर बुडालेल्या सहकारी बँकांबाबत घेतली पाहिजे. अशी भूमिका ही मी मांडली. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची यांची भेट घेऊन प्रयत्न सुरू केले. करोना झाल्याने मधल्या काळात याबाबत माहिती घेऊ शकलो नाही. परंतु आत्ता राष्टवादीचा खासदार म्हणून नाही तर निखळ लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. जिल्ह्याचे दायित्व म्हणून हा विषय संपेपर्यंत लढा निश्चितच पूर्ण करणार, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथे ठेवीदार-खातेदार यांना मार्गदर्शन करताना दिला.

पेण अर्बन बँकेविषयी सुनील तटकरे यांनी संसदेत विषय मांडला होता. मात्र, या विषयाचा पाठपुरावा करावा यासाठी अर्बन बँक ठेवीदार खातेदार यांनी खासदार सुनील तटकरे यांना रविवारी (दि. 20 डिसें.) निवेदन दिले.

यावेळी खासदार तटकरे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली असून कदाचित सोमवारीच (दि. 21 डिसें.) बैठक ठरेल. या बैठकीला संघर्ष समितीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. येत्या 1 फेब्रुवारीपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळेंना घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अनुराग ठाकूर यांना भेटून पेण अर्बन बँकेचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे आहे.

हेही वाचा - आमदार प्रताप सरनाईक यांचा पोलादपूर उमरठ येथे जाहीर निषेध

हेही वाचा - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर 16 जानेवारीला होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.