ETV Bharat / state

खासदार सुनील तटकरे यांचा नेटकऱ्यांशी संवाद; कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा व्यक्त केला विश्वास

author img

By

Published : May 6, 2020, 5:55 PM IST

अनेक तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये ३-४ दिवसांचा स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे, असे तटकरे म्हणाले. त्याचबरोबर, बँक कर्जाच्या हफ्त्यांबद्दल तक्रार आली असता तटकरे यांनी संपूर्ण माहिती पाठवण्याच्या सूचना केल्या.

mp sunil tatkare raigad
खासदार सुनील तटकरे

रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या खास शैलीत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. या संकटाचा बिमोड करण्यात काही देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे, आपणही आत्मविश्वासाने व संयमाने याचा सामना करत या भयावह परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला.

मुंबईत अडकलेल्या कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यांना खासदार तटकरे यांनी योग्य व दिलासादायक मार्गदर्शन केले. सगळ्यांना आपल्या मुळगावी त्यांच्या घरी पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण, हे काम टप्प्याटप्प्याने होईल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, जिल्ह्यात एक लाखाहून अधिक नागरिक परतले असून त्यांचे विलगीकरण करून आपापल्या गावी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकरी, आंबा, काजू, सुपारी उत्पादक तसेच मच्छिमारांना जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. लहान-लहान व्यापारी, उद्योजकांचेही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ऑरेंज झोन असल्याने काही दुकाने, व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हे करताना सुरक्षिततेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जायलाच हवेत, अशा सूचना खासदार तटकरे यांनी केल्या.

तसेच अनेक तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये ३-४ दिवसांचा स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे, असे तटकरे म्हणाले. त्याचबरोबर, बँक कर्जाच्या हफ्त्यांबद्दल तक्रार आली असता तटकरे यांनी संपूर्ण माहिती पाठवण्याच्या सूचना केल्या. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाबाहेर जर एखादी बँक काम करत असेल तर त्या बँकेवर नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन खासदार तटकरे यांनी दिले. सोबतच, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असल्याचेही खासदार तटकरे यांनी नमूद केले. आज या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- CoronaUpdate : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांची शंभरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.