रायगड - केरळात मान्सुनचे आगमन झाले असून राज्यातही मान्सूनचे आगमन झाले आहे. रायगड जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटेपासून पावसाला सुरुावत झाली. गेली दोन दिवस रिमझिम पाऊस जिल्ह्यात पडत आहे. १०,११ जून रोजी अतिवृष्टी दिली असल्याने त्यापूर्वीच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
१०, ११ जून दोन दिवस धोक्याचे
जिल्ह्यात १०, ११ जून हे दोन दिवस धोक्याचे आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावलेही आहेत.
रेनकोट, छत्र्या पडल्या बाहेर
पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी वर्षाभर जतन करून ठेवण्यात आलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर काढण्यात आले आहेत. तर नवीन खरेदीसाठी नागरीक दुकानात गर्दी करीत आहेत.