रायगड - कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षातर्फे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून लाड यांची समजूत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच खासदार सुनील तटकरे यांच्याकडून मनधरणी केल्याची माहिती मिळत आहे.
आमदार लाड हे स्वत:च्या निर्मयावर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीकडून नवीन उमेदवाराचा शोध घेण्याची सुरुवात झाली आहे.