रायगड - परीक्षेत नापास करेन आणि आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. दरम्यान, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
नापास करण्याची धमकी देऊन शिक्षकांचा अत्याचार
माणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे हा पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता. पीडित मुलीला तुला नापास करेन आणि तुझ्या आईची नोकरी घालावेन, अशी धमकी देऊन हा नराधम शिक्षक तिच्यावर शरिरिक अत्याचार करीत होता.
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
अखेर पीडित मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. माणगाव पोलिसांनी मदन वानखेडे याला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नावाने इंस्टाग्रामचे फेक अकाऊंट काढून मित्र मैत्रिणींमध्ये बदनामीचे मेसेज पाठवल्याचाही आरोप मदन वानखेडेवर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - 'बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळता कामा नये'
हेही वाचा - 2021 मध्ये रायगडचा विकास साध्य करणार; पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा संकल्प