ETV Bharat / state

मावळ मतदारसंघात युतीचे प्राबल्य, पण पार्थ पवारांच्या उमेदवारीने चुरस

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, शिवसेनेला विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

मावळमध्ये पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे
author img

By

Published : Mar 16, 2019, 5:13 PM IST

रायगड - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, शिवसेनेला विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे संभाव्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात जोरदार चुरस होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मावळ मतदारसंघ हा २००८ मध्ये तयार झाला असून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे शिवसेनेचा गड काबीज करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाला रायगडचे उरण, पनवेल, कर्जत खालापूर, तर पुणे मतदारसंघातील मावळ, चिंचवड, पिंपरी असे ६ विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. उरण मनोहर भोईर (शिवसेना), पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप), कर्जत खालापूर सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), मावळ बाळा भेगडे (भाजप), चिंचवड (लक्ष्मण जगताप), पिंपरी गौतम चाबूस्वार (शिवसेना) असे विधानसभा निहाय बलाबल आहे. मावळ मतदार संघात शिवसेनेचे 2, भाजप 3, तर राष्ट्रवादीचा १ आमदार आहे. त्यामुळे युतीचे पारडे या मतदारसंघात जड आहे.

शेकापची पनवेल, उरण, खालापूर या विधानसभा मतदारसंघात निर्णायक मते असल्यामुळे त्याचा फायदा आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळू शकतो. तसेच चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात कटुता असल्याने त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत - खालापूर मतदार संघ सोडला तर इतर मतदारसंघात ताकद कमी झाली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचीही ताकद या मतदारसंघात कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मतांची बेरीज करताना कसरत करावी लागणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेकडे आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या स्वरुपाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी सुरुंग लावणार की पुन्हा शिवसेना मावळचा गड राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २००९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळाले नाही. त्यामुळे पार्थ पवारांच्या रूपाने मावळ लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण होणार की अपूर्ण राहणार हे २५ मे ला कळणार आहे.

मावळ मतदार संघात युतीचे प्राबल्य पण पार्थ पवारांच्या उमेदवारीने चुरस वाढली

रायगड : मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असल्याने शिवसेनेला यावेळी विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेचे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बाणे हे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र शिवसेनेकडून अद्याप त्याच्या उमेदवारीची घोषणा अधिकृत केलेली नाही. त्यामुळे पुन्हा श्रीरंग बारणे याना उमेदवारी मिळणार की नवीन चेहरा शिवसेना मावळ मधून देणार हे एक दोन दिवसात ठरणार आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात दुरंगी लढत पहावयास मिळणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असले तरी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मध्ये चुरस निर्माण झाली आहे हे मात्र नक्की.

मावळ मतदार संघ हा 2008 मध्ये तयार झाला असून 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे शिवसेनेचा गड काबीज करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाला रायगडचे उरण, पनवेल, कर्जत खालापूर, तर पुणे मतदारसंघातील मावळ, चिंचवड, पिपरी असे सहा विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. उरण मनोहर भोईर (शिवसेना), पनवेल प्रशांत ठाकूर (ठाकूर), कर्जत खालापूर सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ बाळा भेगडे (भाजप), चिंचवड (लक्ष्मण जगताप), पिंपरी गौतम चाबूस्वार (शिवसेना) असे विधानसभा निहाय बलाबल आहे. मावळ मतदार संघात शिवसेनेचे 2, भाजप 3, तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे युतीचे पारडे या मतदारसंघात जड आहे.

शेकापची पनवेल, उरण, खालापूर या विधानसभा मतदारसंघात निर्णायक मते असल्यामुळे त्याचा फायदा आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मिळू शकतो. तसेच चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात कटुता असल्याने त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत खालापूर मतदार संघ सोडला तर इतर मतदारसंघात ताकद कमी झालेली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचीही ताकद या मतदार संघात कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मताची बेरीज करताना कसरत करावी लागणार आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ हा अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण नेतृत्व असलेले पार्थ पवार यांना संधी दिली असल्याने मावळ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी सुरुंग लावणार की पुन्हा शिवसेना मावळचा गड राखणार हे मतदारांच्या कौलवर अवलंबून राहणार आहे. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे पण यश मिळालेले नाही. त्यामुळे पार्थ पवारांच्या रूपाने मावळ लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण होणार की अपूर्ण राहणार हे 25 मे ला कळणार आहे. तूर्तास पार्थ पवारांच्या उमेदवारीने मावळ मतदारसंघ चर्चेला आलेला आहे हे नक्की.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.