ETV Bharat / state

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली, पर्यटकांना सोसावा लागला नाहक त्रास

या अपघातामुळे पर्यटकांना आपले सामान हातात घेऊन लहान मुलांना सांभाळत प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली
author img

By

Published : May 2, 2019, 8:52 AM IST

रायगड - माथेरानकडून नेरळकडे पर्यटकांना घेऊन निघालेली माथेरानची राणी पुन्हा एकदा रुळावरून घसरल्यामुळे पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ही गाडी रुळावरून घसरून अपघात झाला असला तरी प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. मात्र, रुळावरून गाडी घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बुधवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी माथेरान या स्थानकातून पर्यटकांना घेऊन निघालेल्या गाडीचे जुम्मापट्टी स्थानकाच्या दरम्यान सुमारे ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ४०७ हे इंजिन रुळावरून खाली घसरले. माथेरान राणीला रुळावर पूर्ववत आणण्यासाठी वेळ लागत असल्याने प्रवाशांना पाच किमीचा प्रवास जंगलातून चालत पार करून मुख्य रस्त्यावर यावे लागले. मुख्य रस्त्यावर येताच पर्यटकांना मिळेल त्या वाहनांना हात करत अतिरिक्त पैसे मोजून आपला पुढील प्रवास करावा लागला.

माथेरानची राणी पुन्हा रुळावरून घसरली

या अपघातामुळे पर्यटकांना आपले सामान हातात घेऊन लहान मुलांना सांभाळत प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रवासादरम्यान स्थानिकांनी पर्यटकांना भर उन्हात चालत येत पाहिल्याने या वाटसरूंना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. माथेरान राणीचे हे रडगाणे कायम असेच सुरु असल्याने एकंदरीतच रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसते.

Intro:माथेरानची राणी रुळावरून घसरल्याने पर्यटकांना सोसावा लागला नाहक त्रास

रायगड : माथेरान कडून नेरळकडे पर्यटकांना घेऊन निघालेली माथेरानच्या राणी पुन्हा एकदा रुळावरून घसरल्यामुळे पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. माथेरानची राणी रुळावरून घसरून अपघात झाला असला तरी प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. माथेरान राणी रुळावरून घसरण्याच्या घटनेत वाढ होत चालली असल्याने पर्यटकांच्या सुरक्षितेच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्वाचे आहे. Body:आज सकाळी 9 वाजून 20 मी माथेरान या स्थानकातून घेऊन निघालेल्या पर्यटकाना जुम्मापट्टी स्थानकाच्या दरम्यान सुमारे 11 वा 30 मिनिटाच्या सुमारास 82nm या वळणाच्या ठिकाणी माथेरान राणीचे 407 हे इंजिन रुळावरून खाली घसरले. माथेरान राणीला रुळावर पूर्ववत आणण्यासाठी वेळ लागत असल्याने प्रवाशांना पाच किमीचा प्रवास जंगलातून चालत पार करून मुख्य रस्त्यावर यावे लागले. मुख्य रस्त्यावर येताच पर्यटकांनी मिळेल त्या वाहनांना हात करत अतिरिक्त पैसे मोजून आपला पुढील प्रवास करावा लागला.Conclusion:माथेरान राणीच्या या अपघातामुळे पर्यटकांना आपल्या सामानाच्या बॅगा हातात घेऊन लहान मुलांना सांभाळत प्रवास करावा लागला. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

या प्रवासादरम्यान स्थानिकांनी पर्यटकाना भर उन्हात चालत येत पाहिल्याने या वाटसरूना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
माथेरान राणीचे हे रडगाणे कायम असेच सुरु राहिल्याने एकंदरीत रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.