रायगड - यंदा, दसरा सणाच्या मुहूर्तावर सर्व बाजारपेठा खुल्या झाल्याच्या पाहायला मिळत आहेत. मात्र, नवरात्रौसह दसरा सणाला झेंडूच्या फुलांसह अन्य फुलांनी मागणी जास्त असल्या तरीही आवक कमी असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहेत.
भाव गगनाला भिडल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम
खालापुरात तालुक्यातील खोपोली शहरासह अन्य बाजारपेठेत झेंडू फुले विक्रीसाठी आली आहेत. मागील काही वर्षापेक्षा ह्या फुलांच्या किंमतीत वाढ झाली असल्याने सामान्य नागरिकांना ही फुले खरेदी करण्यास परवडत नाहीत. यावर्षी फुलांचे पीक कमी असल्याने घाऊक बाजारात फुलांचे भाव गगनाला भिडल्याने किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे.
फुले झाली महाग
वरुण राजा मोठ्या प्रमाणावर बरसला असल्याने त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला आहे. फुल शेती कमी प्रमाणात आल्याने राज्यातील शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. फुलांचे पीक कमी आल्याने पुणे, मुंबई, कोकणातील मुख्य बाजारपेठेत या फुलांना मागणी वाढली आहे. त्यातच फुलांचे भाव गगनाला भिडल्याने किरकोळ व्यापारी चिंताग्रस्त आहेत. खालापुर तालुक्यातील खोपोली बाजारपेठ येथे ग्राहाकंची गर्दी असते. बाजारात झेंडूच्या फुलांची वाढती मागणी वाढत आहेत. मात्र, झेंडू फुलांची बाजारपेठेत कमरता भासत असून, फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. झेंडूची फुले खरेदी करणे सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. झेंडूची फुले 120 रूपये किलोपासून 200 रूपये किलो पर्यंत विकली जात आहेत.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाने अडसूळ यांची ईडी चौकशीविरोधातील याचिका फेटाळली