रायगड - सध्या नवरात्रौत्सव सुरू असून उद्या(रविवारी) दसरा आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेल्या या वर्षीच्या नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारले आहेत. निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे झेंडूचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्याचा परिणाम झेंडू फुलांच्या पुरवठ्यावर झाला आहे. या वर्षी बाजारात झेंडू फुलांची आवाक घटली असून फुलांचे दर 150 ते 200 रुपये किलोवर पोहोचली आहेत.
अतिवृष्टीचा फटका..! दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव, नवरात्रौत्सवात ग्राहक नाराज - झेंडूचे दर गगनाला
रायगड जिल्ह्यात झेंडूचे दर गगनाला भिडले आहेत. निसर्ग वादळ आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याने झेंडूच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात झेंडूची आवक घटल्याने आणि दसऱ्यानिमित्ताने मागणी वाढल्याने भाव वाढ झाली आहे.
दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू खातोय भाव