ETV Bharat / state

रायगड : मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा सुरू - रायगड जलवाहतूक

मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी ही बोट सेवा १ ते ५ सप्टेंबरला गणपती सणापर्यंत सुरू होत असते. मात्र, यावेळी पाऊस अद्यापही सुरू असल्याने ही बोटसेवा सुरू होण्यास उशीर झाला आहे.

रायगड : मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा सुरू
author img

By

Published : Sep 23, 2019, 6:01 PM IST

रायगड - पावसाळ्यामुळे चार महिने बंद असलेली मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा आज (सोमवार) २२ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. सध्या सुरू झालेली बोटसेवा अर्धवेळ असून हवामानाच्या अंदाजानुसार सुरू राहणार आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने यावेळी मांडवा गेट वे जलवाहतूक सेवा उशिरा सुरू झाली आहे. जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

रायगड : मांडवा ते गेट वे जलवाहतूक बोटसेवा सुरू

हे ही वाचा - मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; राज्य सरकार जलवाहतूक सुरू करण्याच्या तयारीत

अलिबागमार्गे मुंबईमध्ये जाण्यासाठी जलवाहतूक सगळ्यात सोयीस्कर मार्ग आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी मांडवा ते गेट वे ही बोटसेवा हवामानामुळे चार महिने बंद केली जाते. त्यामुळे अलिबाग आणि मुंबईतील प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो. पर्यटकांनाही हा जलवाहतूकीचा प्रवास आनंददायी व सुखकारक वाटतो.

हे ही वाचा - कोकणातील खड्डेमय रस्त्यांवरून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू

पावसाळ्यात मांडवा ते गेट वे जलवाहतूक सेवा बंद असल्याने मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याने एसटी बस, खासगी वाहने अथवा स्वतःच्या वाहनाने जावे लागते. सोमवारी २२ सप्टेंबरपासून ही जलवाहतूक बोटसेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी ही बोटसेवा १ ते ५ सप्टेंबरला गणपती सणापर्यंत सुरू होत असते. मात्र, यावेळी पाऊस काळ वाढवल्याने ही बोटसेवा सुरू होण्यास उशीर झाला आहे.

हे ही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची महाड येथे सांगता

दरम्यान, बोटसेवा देणाऱ्या कंपन्यांनी तिकीट दरात ५ रुपयांची वाढही केली आहे. तर अजूनही पावसाळी वातावरण असल्याने बोट सेवा अर्ध वेळ सुरू राहणार आहे.

Intro:मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा आजपासून सुरू

प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

रायगड : पावसाळा सुरू झाल्यानंतर चार महिने बंद असलेली मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा आज 22 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. सध्या सुरू झालेली ही बोटसेवा अर्धवेळ असून हवामानाच्या अंदाजानुसार सुरू राहणार आहे. पाऊस अद्यापही सुरू असल्याने यावेळी मांडवा गेटवे जलवाहतूक सेवा उशिरा सुरू झाली आहे. जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.Body:अलिबाग मार्गे मुंबई मध्ये जाण्यासाठी सोपस्कार मार्ग म्हणजे जलवाहतूक बोटसेवा. जून महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी मांडवा ते गेटवे ही बोटसेवा पावसाळ्यातील हवामानामुळे चार महिने बंद केली जाते. त्यामुळे अलिबागकडे येणाऱ्या मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत असतो. पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनाही हा जलवाहतूक प्रवास आनंददायी व सुखकारक वाटतो. Conclusion:पावसाळ्यात मांडवा ते गेटवे जलवाहतूक सेवा बंद असल्याने मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना खड्डेमय रस्त्याने एसटी बस, खाजगी स्वतःच्या वाहनाने जावे लागत होते. त्यामुळे वेळ लागत होता. आज 22 सप्टेंबर पासून ही जलवाहतूक बोटसेवा सुरू झाल्याने प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरवर्षी ही बोटसेवा 1 ते 5 सप्टेंबर पर्यंत म्हणजे गणपती सणाला सुरू होत असे. मात्र यावेळी पावसाने अजून आपली सुट्टी वाढवल्याने बोट सेवा सुरू होण्यास उशीर झाला आहे.

मांडवा ते गेटवे जलवाहतूक बोटसेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद पसरला असला तरी बोटसेवा कंपन्यांनी तिकीट दरात 5 रुपयांची वाढही केली आहे. तर अजूनही पावसाळी वातावरण असल्याने बोटसेवा अर्धवेळ सुरू राहणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.