ETV Bharat / state

जनसेवा पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा; व्यवस्थापक नरेंद्र भुसाणेंना ठेवीदारांचा चोप - जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार

श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकल्या आहेत. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण केली.

नरेंद्र भुसाणे
author img

By

Published : Sep 19, 2019, 11:03 PM IST

रायगड - श्रीवर्धनचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण केली आहे. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत.

जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे यांना ठेवीदारांचा चोप

जनसेवा पतसंस्थेत भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केल्याची शंका ठेवीदारांना आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाला असून ठेवीदारांचे पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी आपला राग भुसाणे यांच्यावर काढला. यावेळी पोलिसांनी भुसाणे याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. ठेवीदारांचा मार खाल्यानंतर भुसाणे हे गुपचुप निघून गेले.

हेही वाचा - केवळ ४.७ किलोग्रॅम वजनाच्या बाळाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था 1994 साली स्थापन करण्यात आली होती. या पतसंस्थेने थोड्याच दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. पतसंस्थेत करोडोंचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकल्या आहेत. 19 सप्टेंबर रोजी सर्वांच्या ठेवी परत मिळतील असे बोलले जात होते. मात्र, ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने ठेवीदारांनी नरेंद्र भुसाणे यांना चपलांनी मारहाण केली. पोलिसांनी भुसाणे यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा श्रीवर्धन येथे येणार आहे. जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार ही यात्रा रोखणार असल्याचे बोलले जात आहे.

Intro:
जनसेवा पतसंस्थेत करोडोचा घोटाळा करणाऱ्या श्रीवर्धनच्या नगराध्यक्षाना ठेवीदारांचा चोप

नरेंद्र भुसाणे यांना चपला, हाता बुक्याने ठेविदारकडून मारहाण

नरेंद्र भुसाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष

रायगड : श्रीवर्धनचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे याना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण करून चोप दिल्याने एकच चर्चा श्रीवर्धनमध्ये रंगली आहे. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. जनसेवा पतसंस्थेत भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केल्याच बोलले जात आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाला असून ठेवीदारांचे पैसे मिळण्यात अडचणी येत असल्याने ठेवीदार संतप्त झाले असून त्यांनी आपला राग भुसाणे यांच्यावर चोप देऊन काढला. यावेळी पोलिसांनी भुसाणे याचे संरक्षण करण्याचा असफल प्रयत्न केला. ठेवीदारांचा मार खाल्यानंतर भुसाणे हे गुपचुप निघून गेले. मात्र यानंतर तरी ठेवीदारांचे पैसे मिळतील का ही शंकाच आहे. Body:जिल्ह्यात पेण अर्बन बँक, रोहा अर्बन बँक, गोरेगाव अर्बन बँक तसेच काही पतसंस्था ह्या संचालक मंडळांनी डबघाईत घातल्या आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले गेले आहेत. श्रीवर्धन मधील नावारूपाला आलेली जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थाही अशीच चेअरमन व संचालक, व्यवस्थापक मंडळानी डबघाईत घालवली आहे.Conclusion:श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था 1994 साली स्थापन करण्यात आली होती. या पतसंस्थेच्या थोड्याच दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक पतसंस्थेत ठेवी ठेऊ लागला.
जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था नावारूपाला आली असता पतसंस्थेचे व्यवस्थाप व नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केली असल्याचा आरोप होत आहे. त्यातच भुसाणे हे काही दिवस श्रीवर्धन मधून गायब होते.

पतसंस्थेत करोडोचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकली आहे. 19 सप्टेंबर रोजी सर्वांची ठेवी परत मिळतील असे बोलले जात होते. मात्र ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने ठेवीदारांनी नरेंद्र भुसाणे याना चपलेने, हाता बुक्याने मारहाण केली. पोलिसांनी भुसाणे यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ठेवीदारांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

श्रीवर्धनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज 19 सप्टेंबर रोजी येणार असल्याने ठेवीदार ही यात्रा रोखणार असल्याचे बोलले जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.