रायगड - वाढदिवसानिमित्त मटणाची पार्टी कार्यालयात साजरी करणाऱ्या महाड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत गोडाबे याना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी गोडाबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, इतर अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई केली जाणार? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कार्यालयातच मटण पार्टी करणे गटविकास अधिकाऱ्याला पडले महाग, झाली निलंबनाची कारवाई
महाड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत गोडाबे यांचा 29 एप्रिलला वाढदिवस होता. यानिमित्ताने गोडाबे यांनी पंचायत समिती कार्यालयातच वाढदिवस साजरा करून मटणाची पार्टीचे आयोजन केले होते. या मटणाच्या पार्टीला अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पदाधिकारी यांनी मटणावर ताव मारल्याची घटना समोर आली होती.
मटणाची पार्टी गटविकास अधिकाऱ्याला पडली महाग
रायगड - वाढदिवसानिमित्त मटणाची पार्टी कार्यालयात साजरी करणाऱ्या महाड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत गोडाबे याना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी गोडाबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, इतर अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई केली जाणार? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Last Updated : May 1, 2020, 3:18 PM IST