ETV Bharat / state

Uaran Fire News : उरणमध्ये 20 दुकानांना आग; जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान

author img

By

Published : Jan 2, 2023, 9:08 PM IST

उरण तालुक्यातील सोनारी गावाच्या हद्दीमध्ये असणारी 20 दुकाने जळून (20 shops burn down at Uran) खाक झाली आहेत. प्रकल्पग्रस्त बेरोजगार स्थानिकांना उदरनिर्वाहाच साधान मिळावा या हेतूने जेएनपिटी बंदर प्रशासनाकडून ही दुकाने देण्यात आली होती. मात्र ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने, येथील 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Uaran Fire News)

20 shops burn down at Uran
उरणमध्ये 20 दुकानांना आग

रायगड : नववार्षाच्या पहिल्यादिवशी संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताचा (New Year welcome) जल्लोष करत असताना, उरण तालुक्यातील सोनारो गावाशेजारी असणाऱ्या 20 दुकानांना आग (20 shops burn down at Uran) लागण्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजता लागलेल्या या आगीमध्ये ही दुकाने जाळून खाक झाली आहेत.

20 shops burn down at Uran
उरणमध्ये 20 दुकानांना आग

40 ते 50 लाखांचे नुकसान : प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांच्या कुटुंबियांना जेएनपिटी बंदर प्रशासनाकडून बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने ही दुकाने देण्यात आली होती. दरम्यान दुकानांना आग लागण्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. मात्र या आगीमध्ये जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान (loss of around 40 to 50 lakhs ) झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जळालेल्या दुकानांमधील एका दुकानामध्ये 70 वर्षीय लिलाबाई म्हात्रे या झोपल्या होत्या. त्यांना दुकानाला आग लागली असल्याचे लक्षात येताच त्या वेळीच बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. मात्र या आगीमध्ये त्यांचे सर्वच जाळून खाक झाले आहे. यामध्ये त्यांचे महत्वाचे कागदपत्र, पाच तोळे सोने आणि कपड्यांसह भांडी देखील जाळाली आहेत. तर त्यांचा निवांराही नष्ट झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असून, निवाराही नष्ट झाला आहे.

20 shops burn down at Uran
उरणमध्ये 20 दुकानांना आग

जेएनपिटी प्रशासनाकडून मदतीची मागणी : आग लागून दुकाने नष्ट झाल्याने 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पुन्हा एकदा दुकानाची उभारणी करण्याची ऐपत नडल्याने, या दुकानदारांकडून जेएनपीटीने प्रकारची दाखल घेऊन दुकानाची उभारणी करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. सध्यातरी या 20 कुटुंबावर उपास्मारीची वेळ आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.