ETV Bharat / state

महिला धावपटू ललिता बाबर यांची 'उत्तुंग झेप'; माणगावच्या तहसीलदारपदी आजपासून रुजू

author img

By

Published : Nov 27, 2020, 7:25 PM IST

Updated : Nov 27, 2020, 7:44 PM IST

जागतिकस्तरावर पी. टी. उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू अशी ललिता बाबर यांची ओळख आहे. शेतमजूर कुटुंबातून असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

ललिता बाबर
ललिता बाबर

रायगड - भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदार पदावर माणगाव येथे नेमणूक झाली आहे. खेळाडू कोट्यातून तहसीलदारपदी त्यांची सरकारने नियुक्ती केली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. ललिता बाबर या राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत.

ग्रामीण भागातील ललिता बाबर यांनी अत्यंत संघर्ष करत यशासाठी उत्तुंग झेप घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात असलेल्या मोही या लहान खेडेगावात ललिता बाबर यांचा जन्म झाला. जागतिकस्तरावर पी. टी. उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेल्या खेळाडू अशी ललिता बाबर यांची ओळख आहे. शेतमजूर कुटुंबातून असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्या जिल्हास्तरावरील शालेय मैदानी स्पर्धांमध्ये नेहमीच स्पर्धा जिंकत आलेल्या आहेत. बाबर यांनी मध्यम व लांब अंतराच्या धावण्याच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले. त्यानंतर त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला.

महिला धावपटू ललिता बाबर यांची 'उत्तुंग झेप'

क्रीडा व अर्जुन पुरस्काराने सन्मानित

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ वर्षी क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना 'स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर' असे म्हटले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू माणगावला तहसिलदार म्हणून लाभल्याने माणगावचे नाव उंचावले आहे. माणगांवकरांकडून नवनियुक्त प्रभारी तहसीलदार यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.