रायगड - श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात एका कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबाला वरळी येथून घेऊन आलेल्या चालकाला एलसीबी पथकाने गोरेगाब मुंबईमधून अटक केली होती. मात्र तो चालकही पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्हा पोलिस दलात भीतीचे वातावरण पसरले होते. त्या चालकाच्या संपर्कात आलेल्या एलसीबीच्या दोन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना क्वारंन्टाईन करण्यात आले होते. आनंदाची बाब म्हणजे या चारही जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने पोलिसांसह अलिबागकारांनी भयमुक्त झाले आहेत.
4 एप्रिल रोजी श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात वरळी येथून पाच जणांच कुटुंब हे इनोव्हा कार भाड्याने करून आले होते. त्यानंतर यातील एकाला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास पनवेल येथे रुगणालायत ठेवले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये त्या व्यक्तीची पत्नी आणि तीन मुले हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर 24 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र या कुटुंबाला आणले कोणी याचा शोध रायगड पोलीस घेत होते. त्याचा तपास अलिबाग येथील एलसीबीकडून सुरू होता.
एलसीबी पथकाने भोस्ते येथील कुटूंबाला कारने आणलेल्या चालकाला आणि त्याच्या मालकाला गोरेगाव येथून अटक करून आणले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एलसीबी पथकाने त्यांना आणताना खबरदारी घेतली होती. अटक करून त्याची तपासणी केली असता तो चालक हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे एलसीबी विभागात तसेच पोलीस दलात भीतीचे वातावरण पसरले होते.
चालकाच्या संपर्कात आलेल्या दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना त्वरित अलिबाग जिजामाता रुग्णालयात क्वारंन्टाईन करण्यात आले होते. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी क्वारंन्टाईन केल्याने पोलिसांसह अलिबागकारामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कवारंन्टाईन केलेल्या एलसीबीच्या चारही जणांचे नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले.
आतापर्यत अलिबागमध्ये बारा हजारहून मुंबई, परराज्यातून दाखल झाले असले तरी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कवारंन्टाईन केल्याने अलिबागकारामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने पोलिसांसह अलिबागकर भयमुक्त झाले आहेत.