ETV Bharat / state

खंडाळा घाटातील मंकी हिल भागात कोसळलेली दरड हटवली; पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत

खंडाळा घाटातील मंकी हिल भागात कोसळलेली दरड हटवली असून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे. मुंबईहून हैदराबाद आणि चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.

रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड
author img

By

Published : Jul 8, 2019, 6:04 PM IST

Updated : Jul 8, 2019, 7:46 PM IST

मुंबई- खंडाळा घाटात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल येथे कोसळलेली दरड 3 वाजून 45 मिनिटांनी हटवण्यात आली. यानंतर पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे.

रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड

या घटनेत दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरड हटवल्यानंतर डाऊन आणि मिडल लाईनवरील बंद झालेली रेल्वे वाहतूक पूर्ववत होत आहे.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे. दरड कोसळल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सेवा काही वेळ ठप्प झाली होती.

मुंबई-हैदराबाद आणि मुंबई-एलटीटी चेन्नई या दोन एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र, सीएसएमटीकडे येणाऱ्या उपनगरीय मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

Intro:खंडाळा घाटात मंकी हिल येथे दरड कोसळली

पुणेकडे जाणारी रेल्वे सेवा कोलमडली

रायगड : मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल येथे दरड कोसळली. यामुळे पुणे कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे.Body:मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा येथील मंकी हिलवर पुन्हा एकदा दरड कोसळली. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.Conclusion:रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी दरड काढण्याचे काम करीत आहेत. दरड कोसळल्याने पुणे कडे जाणारी रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली आहे.
Last Updated : Jul 8, 2019, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.