रायगड : आंबेनळी दरीत कालिका पाँईटजवळ दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपण बंद झाली आहे. ही घटना रात्री अकरा वाजता घडली आहे. दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे खचून दरीत कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या विस्कळित झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग बंद : आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णपण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर मोठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलादपूर महाबळेश्वर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने ताम्हणी घाटाचा वापर करण्याचा वाहतूक विभागाने सल्ला दिला आहे.
दरड कोसळल्याने रस्ता खचला : आंबेनळी घाटात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील दरड कोसळून एका बाजुचा रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्ता खचून तो दरीत पडल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे आंबेनळी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजुचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहन चालकांना अडकून पडावे लागले आहे. दरड हटवण्याचे काम सद्या युद्धपातळीवर सुरू आहे.
दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या : पावसाळा सुरू झाला असला, तरी राज्यात अद्यापही मोठा पाऊस सुरू झाला नाही. मात्र आंबेनळी घाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर असलेल्या घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात या मार्गावरुन प्रवास करणे मोठे धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी कोकणात जाताना पुरेशी खबरदारी घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला वाहतूक विभागाकडून देण्यात येत आहे.
पोलादपूरपासून 40 किमीचा घाट : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी हा घाट आहे. जावळीच्या घनदाट अरण्यातील हा मोठा धोकादायक घाट असल्याचे बोलले जाते. पोलादपूर ते महाबळेश्वर महामार्गावर दोन मोठे घाट लागतात. त्यात आंबोनळी हा सगळ्यात मोठा घाट आहे. या घाटाची लांबी तब्बल 40 किमी आहे. त्यामुळे वाहन चालकाला या घाटात मोठी खबरदारी घेत वाहन चालवावे लागते.
हेही वाचा -