ETV Bharat / state

कर्जतमध्ये पर्यटक तरुणीची अश्लील चित्रफीत बनवण्याचा प्रयत्न; केअर टेकरला बेड्या - karjat police

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेवाळी येथे एका फार्म हाऊसवर पर्यटक तरुण-तरुणींचा ग्रुप आला होता. त्यापैकी एक तरुणी रूममध्ये अंघोळ करत असताना फार्म हाऊसच्या केअरटेकरने त्याचे चोरून शूटिंग करून अश्लील चित्रफीत बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या तरुणीच्या भावाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

कर्जतमध्ये पर्यटक तरुणीची अश्लील चित्रफीत बनवण्याचा प्रयत्न; केअर टेकरला बेड्या

author img

By

Published : Oct 2, 2021, 10:55 AM IST

रायगड : पर्यटनासाठी आलेल्या तरुणीचे अश्लील चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फार्म हाऊसच्या केअर टेकरला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. विनीत मोहिते असे अटक केलेल्या केअर टेकरचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेवाळी येथे एका फार्म हाऊसवर पर्यटक तरुण-तरुणींचा ग्रुप आला होता. त्यापैकी एक तरुणी रूममध्ये अंघोळ करत असताना फार्म हाऊसच्या केअरटेकरने त्याचे चोरून शूटिंग करून अश्लील चित्रफीत बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या तरुणीच्या भावाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

बाथरूमच्या की होलमधून व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डोंबिवलीतील तरुण-तरुणींचा एक ग्रुप तालुक्यातील नेवाळी येथे मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी एका फार्म हाऊसवर पर्यटनासाठी आला होता. साधारण ८ जणांचा हा ग्रुप होता. यातील २२ वर्षीय तरुणी स्वीमिंगपूल मध्ये काही वेळ जलतरण केल्यावर शॉवर घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेली असता येथील केअर टेकर विनीत वामन मोहिते हा देखील तिच्या मागे मागे गेला होता. ही बाब तरुणीच्या भावाने पाहिली होती. त्यामुळे शंका आल्याने तो देखील त्याच्या मागे गेला. तेव्हा विनीत हा बाथरूमच्या चावीसाठी असलेल्या होलमधून मोबाईलमध्ये तरुणीची अश्लील चित्रफीत मोबाईलमध्ये काढताना त्याला दिसला. हा प्रकार पाहिल्याने त्याने त्याला पकडून थेट नेरळ पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नेरळ पोलिसांनी आरोपी विनीत मोहिते याच्या विरोधात याबाबत गु.र.नं.199/2021 भा.दं.वि.क.354 C प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या करीत आहेत.

कर्जतला पर्यटकांची पसंती

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस व रिसॉर्ट आहेत. येथील निसर्गपूरक वातावरण पर्यटकांना कायम भुरळ घालत असते. मुंबई-पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कर्जत तालुक्यात पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.

हेही वाचा - ऑनलाईन शिकवणी वर्गात अश्लील व्हिडीओ; शिक्षक विद्यार्थांना बसला धक्का!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.