ETV Bharat / state

विवाहित महिलेची प्रियकराबरोबर गळफास घेऊन माहेरात आत्महत्या

author img

By

Published : Mar 5, 2019, 3:21 PM IST

Updated : Mar 5, 2019, 4:01 PM IST

आज सकाळी १० वाजले तरी दोघे उठत नसल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडला असता दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

आत्महत्या

रायगड - कर्जत तालुक्यात काही दिवसांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंधातून युगुलांनी आपले जीवन संपवण्याच्या घटना घडत आहे. विवाहित महिलेने प्रियकराबरोबर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेरळातील भांडवल दामात कातकरी वाडी येथे घडली. सीमा पालकर आणि समीर पवार अशी मृतांची नावे आहेत.समीर पवार हा अविवाहित असून तो कर्जत येथील बांबनोली येथे राहत होता. त्याचे नेरळ येथील दामात वाडी येथे राहणारी सीमा पालकर या विवाहित महिलेवर प्रेम होते.

आत्महत्येनंतर पोलीस मृतदेह काढताना

सीमा ही समीरच्या संपर्कात आल्यापासून ते दोघे एकत्र राहत होते. काही दिवसापासून सीमा आणि समीर हे नेरळला तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आले होते. आज सकाळी 10 वाजले तरी दोघे उठत नसल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडला असता दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

सीमा पालकर ही विवाहित असून नवऱ्यापासून ती वर्षभर दूर होती. नवऱ्यापासून तिला दोन मुले होती. मोठा मुलगा हा नवऱ्या जवळ राहत असून लहान मुलगा हा सीमा हिच्याकडे राहत होता.
नेरळ हादरून टाकणाऱ्या या प्रकरणाचा नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमी युगुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:कर्जत मध्ये पुन्हा एकदा विवाह बाह्य प्रेम संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या

रायगड : कर्जत तालुक्यात काही दिवसापासून विवाहबाह्य प्रेम संबंधातून प्रेम युगालानी आपलं जीवन संपवण्याच्या घटना घडत आहे. त्यात आता अजून एका घटनेची भर पडली आहे. एका विवाह बाह्य प्रेम युगलानी आपलं जीवन संपवलं आहे ही घटना नेरळ येथील भांडवल दामात कातकरी वाडी येथे घडली आहे. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

समीर पवार असे या मुलाचे नाव असून तो अविवाहित होता. कर्जत येथील बांबनोली येथे राहणारा असून त्याचे नेरळ येथील दामात वाडी येथे राहणारी सीमा पालकर या विवाहित महिलेवर प्रेम होते.
Body:सीमा हि समीरच्या संपर्कात आल्यापासून ते दोघे एकत्र राहत होते. काही दिवसा पासून सीमा आणि समीर हे नेरळला म्हणजे सीमा हिच्या आईच्या घरी राहण्या साठी दोघे आले होते. सकाळी 10 वाजले तरी दोघे उठत नसल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडला असता दोघेजण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.Conclusion:सीमा पालकर हि विवाहित असून नवऱ्या पासून ती वर्षभर दूर होती. नवऱ्या पासून तिला दोन मुले होती. मोठा मुलगा हा नवऱ्या जवळ राहत असून लहान मुलगा हा सीमा हिच्याकडे राहत होता.
नेरळ हादरून टाकणाऱ्या या प्रकरणाचा नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र वाढत्या प्रेमप्रकरणातील आत्महत्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
Last Updated : Mar 5, 2019, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.