ETV Bharat / state

अजब छंद! घरातच पाळल्या मधमाशा; तरीही संपूर्ण कुटुंब बिनधास्त - bee city

अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशांची शेती करतात. पण, खारघरमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वप्निल चौधरी यांनी छंद म्हणून थेट आपल्या घरातच मधमाशा पाळल्या आहेत.

raigad
मधमाशा पालनाचा अनोखा छंद
author img

By

Published : Jan 6, 2020, 8:12 AM IST

रायगड - आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, किंवा जास्तीत जास्त पोपट, कबुतर पाळतो. मात्र, खारघरमधल्या एका कुटुंबाने आपल्या घरात चक्क मधमाशा पाळल्या आहेत. मधमाशी पालनाचा हा अजब छंद सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मधमाशा पालनाचा आगळावेगळा उपक्रम

अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशांची शेती करतात. पण, खारघरमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वप्निल चौधरी यांनी छंद म्हणून थेट आपल्या घरातच मधमाशा पाळल्या आहेत. पहाट झाली की मधमाशांची स्वारी फुलांकडे झेपावते. त्या फुलांवर घोंगावू लागतात आणि हळूहळू त्याची संख्या वाढत जाते. झुंडीनं येणाऱ्या मधमाशा पाहून आता डॉ. चौधरी यांच्या मुलीनेही मधमाशांशी मैत्री केली आहे.

खारघरमधील डॉ. युवराज कागीणकर यांनी बी सिटी ही संकल्पना उदयास आणली. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात देखील ही संकल्पना राबविली जाते. मात्र, भारतात मधमाशी पालनाबाबत कोणतीही जनजागृती झालेली नाही. डॉ. कागीणकर यांनी पुढाकार घेऊन खारघरमध्ये घरोघरी मधमाशा पाळण्याचा हा उपक्रम वाढवला. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तर मिळतोच आहे. पण बाजारातील भेसळयुक्त मधाऐवजी शुद्ध मध चाखायला मिळण्याचा वेगळाच आनंद असल्याचा आनंद नागरिकात दिसून येत आहे.

हेही वाचा - 'विकासाबरोबर बेरोजगारीचे प्रमाण कमी करणार'

मधमाशी पालनाचा हा छंद निसर्गाचा समतोल राखण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. यातून आपल्याला शुद्ध मध चाखायला तर मिळेलच. मात्र, सोबतच मधमाशा बदलत्या वातावरणासाठी किती महत्वपूर्ण आहेत हेही कळेल. त्यामुळे आपणालाही काहीतरी आगळेवेगळे करण्याची हौस असेल तर, घरात मधमाशा पाळून बघायला हरकत नाही.

हेही वाचा - १०७ व्या 'इंडियन सायन्स काँग्रेस' अधिवेशन : महाराष्ट्रातील विद्यार्थिनीला मिळाला इन्फोसिस फाउंडेशन आयएससीए ट्रॅव्हल अवॉर्ड

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे.

बाईट:-1) डॉ. स्वप्नील चौधरी, रहिवासी, खारघर

2) डॉ. युवराज कागीणकर, संस्थापक, बी सिटी खारघर

पनवेल

आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, किंवा जास्तीत जास्त पोपट कबुतर पाळतो, पण खारघरमधल्या एका कुटुंबाने आपल्या घरात चक्क मधमाशा पाळल्या आहेत. मधमाशी पालनाचा हा अजब छंद सध्या चर्चेचा विषय बनलाय.

अनेक जण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधमाशांची शेती करतात. पण खारघरमध्ये राहणाऱ्या डॉ. स्वप्नील चौधरी यांनी तर छंद म्हणून थेट आपल्या घरातच मधमाशा पाळल्या आहेत. कधी मधमाशांच्या एकाच डंखाने एवढा त्रास होतो की त्या घरात कसे काय पळू शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल....ऐका डॉ. स्वप्नील चौधरी यांच्याकडूनच....
Body:पहाट झाली की मधमाश्यांची स्वारी फुलांकडे झेपावते, त्या फुलांवर घोंगावू लागतात व एक, दोन, तीन, करता करता त्याची संख्या वाढत जाते. झुंडीनं येणा-या मधमाश्या पाहून आता डॉ. स्वप्नील चौधरी यांच्या मुलीनेही मधमाशांशी मैत्री केलीये. माणसापेक्षा कैक पटीने लहान असणा-या या मधमाश्यांच्या सहवासात राहण्याची गेले काही महिने एवढी सवय झाली आहे की एखाद् दुस-या दिवशी चुकून माकून मधमाश्या नाही आल्या की अरे वा आज आपले शेजारी आले कसे नाहीत, असा प्रश्न आम्ही मस्करीत एकमेकांना विचारतात.

जर घरात मधमाशा पाळायच्या म्हटलं तर त्यांच्यासाठी रहायला एक छोटंसं घर ही आहे. याची रचना कशी असते पाहुयात...

खारघरमधीच डॉ. युवराज कागीणकर यांनी बी सिटी ही संकल्पना उदयास आणली. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात देखील ही संकल्पना राबविली जाते. मात्र भारतात मधमाशी पालनाबाबत कोणतीही जनजागृती झालेली नाही. डॉ. कागीणकर यांनी पुढाकार घेऊन खारघरमध्ये घरोघरी मधमाशा पाळण्याचा हा उपक्रम वाढवला. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तर मिळतोच आहे पण बाजारातील भेसळयुक्त मधाऐवजी शुद्ध मध चाखायला मिळतं याचा आनंद ही वेगळाच....
Conclusion:त्यामुळे तुम्हाला ही असे अजब छंद पाळायचे हौस असेल तर घरात मधमाशाचं शेजारपण ठेवायला काही हरकत नाही. एक शेजारी मिळतीलच पण सोबत गोड गोड मधाची चव ही चाखायला मिळेल.

प्रमिला पवार, ईटीव्ही भारत, पनवेल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.