रायगड : पेट्रोल, डिझेल कारची जागा (Expensive Petrol and Diesel) आता इकोफ्रेंडली इलेक्ट्रिक वाहनांनी घेतली (Eco Friendly Electric Jeep) आहे. मात्र, इलेक्ट्रिक कार घेणे हे प्रत्येकाच्या आवाक्यातलं नाही. अशाच एका रायगड जिल्ह्यातील अवलीयाने आपले स्वप्न पूर्ण करून, त्यातून तरुणांना रोजगार निर्मिती करता यावी यासाठी टाकाऊ वस्तूंमधून इलेक्टिक जीप तयार केली (Jeep Made From Waste Materials) आहे. ही जीप पूर्णतः होममेड असून, तळा तालुक्यातील रस्त्यांवर सध्या या जीपची धूम पाहायला मिळत आहे.
70 टक्के टाकाऊ वस्तूंमधून बनवली इलेक्ट्रिक जीप : केबल व्यवसायातून पत्रकारिता करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एका अवलीयाने, टाकाऊ वस्तूंमधून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. सध्या या जीपची चर्चा संपूर्ण तळा तालुक्यात होत असून, या अवलीयाचं कौतुकदेखील होत आहे. सध्या इकोफ्रेंडली वाहनांना जास्त पसंती दर्शविण्यात येत आहे. अशाच प्रकारची एक फॅमिली कार आपल्या दारातसुद्धा उभी राहावी हे स्वप्न तळा तालुक्यातील पत्रकार विराज टिळक यांचं होतं.
कोरोनामुळे नवनवीन तंत्रज्ञान-उद्योग तरुणांना मिळावा हीच प्रेरणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसायातील मंदी, निसर्ग चक्रीवादळ यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती स्वप्नपूर्तीआड येत होती. यातूनच टाकाऊ वस्तूंमधून घरीच इलेक्ट्रिक कार बनवण्याचा विचार आला आणि ही जीप तयार झाली. 70 टक्के टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेली ही जीप 4 बॅटरी आणि एका मोटारवर एका चार्जमध्ये 75 ते 80 किलोमीटर धावते. तर पूर्ण चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. यासाठी 35 रुपये इतका खर्च येतो. ही जीप बनवण्यासाठी एकूण दीड लाख रुपये एवढा खर्च आला असून, ही जीप संपूर्ण होममेड असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा प्रयोगातून तरुणांच्या विचारांना चालना मिळेल : पत्रकार विराज टिळक यांनी आपले स्वप्न आपल्या जिद्दीने पूर्ण केले आहे. त्यातूनच अशा प्रकारे आपल्या मेहनतीच्या जोरावर नवनवीन कल्पना सत्यात उतरवणारऱ्या तरुणांना प्रेरणाही मिळणार आहे. तर अशा प्रकारचे उपक्रम राज्यशासनाने सुरू केल्यास, यातून रोजगार निर्मिती नक्कीच होईल, आणि तरुणांच्या विचारांनाही चालना नक्कीच मिळेल. ही कार बनवण्यासाठी आपल्याला माझ्या मित्रांनी व इतर सहकाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केले.
हेही वाचा : Electric Vintage Car : विद्यार्थ्याने बनवली बॅटरीवर चालणारी कमी खर्चातील इलेक्ट्रिक विंटेज कार