रायगड - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात 114 पोलीस अधिकारी, एसआरपीएफच्या 2 तुकड्या, 350 मुख्यालय कर्मचारी, 1600 स्थानिक पोलीस ठाणे कर्मचारी, 511 होमगार्ड, दोन दंगल नियंत्रक पथके असा भला मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जनतेला शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त
अयोध्या राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लगले होते. दरम्यान, जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी ही पावले उचलली आहेत. याशिवाय, सोशल मिडियावरही पोलिसांचे लक्ष आहे. निकालानंतर नागरिकांनी शांतता राखावी आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करत पोलिसांनी लाँगमार्चदेखील काढला होता.