रायगड - रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत असलेली आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 17 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे रायगड पोलिसांच्या या याचिकेवर जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देणार हे 17 डिसेंबरला कळणार आहे.
5 नोव्हेबर रोजी पोलिसांनी दाखल केली होती पुनर्विचार याचिका
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख याना 4 नोव्हेबर रोजी मुबई येथून अटक केली होती. त्यानंतर रायगड पोलिसांनी तिघांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. तिघांना मिळालेल्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलीस यांनी जिल्हा सत्र न्यायालयात 5 नोव्हेबर रोजी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
पुनर्विचार याचिकेबाबत आता 17 डिसेंबरला सुनावणी
रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर जिल्हा सत्र न्यायाधीश एम जे मल्लशेट्टी याच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आता ही सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे. आतापर्यत या सुनावणीत पाच तारखा न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे 17 डिसेंबरला न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - यवतमाळच्या सुताला चीनसह हाँगकाँगमधून मागणी; कोरोनासह मंदीतही बाबासाहेब नाईक सूतगिरणीची कामगिरी
हेही वाचा - नितेश सरडा आणि फिरोज शेख यांनी जामीन अर्ज घेतला मागे, पुनर्विचार याचिकेबाबत अद्याप निर्णय नाही