ETV Bharat / state

'सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून केला होता नवस तो आज फेडला' - shivsena panvel

जर राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला तर गव्हाच्या कणकेत पंचामृत घालून त्या पिठाचे एक हजार दिवे लावू, असा नवस शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी केला होता. अखेर काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या महिलांचा हा नवस पूर्ण झाला आहे.

पनवेल
शिवसेना महिला आघाडी
author img

By

Published : Nov 29, 2019, 10:40 PM IST

रायगड- शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा म्हणून पनवेलमधल्या महिलांनी चक्क संकटमोचक हनुमान मंदिरात नवस केला होता. हे सरकार पडल्यानंतरच अनवाणी पायाने चालत येऊन नवस फेडेल आणि मगच पायात चप्पल घालेल, असा नवस शेतकऱ्याने केला होता. या महिलांचा हा नवस पूर्ण झाल्याने आज पनवेल मधल्या हनुमान मंदिरात त्यांनी हा नवस फेडला.

आढावा घेताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी प्रमिला पवार

राजकीय नेत्यांवर त्यांच्या समर्थकांची असलेली निष्ठा व त्या करिता काहीही करण्यास धजावणारे कार्यकर्ते आपल्याकडे नवीन नाही. अशीच एक काहीशी वेगळी घटना आज पनवेलमध्ये घडली आहे. राज्यात सत्तास्थापन होत असताना समसमान वाटपाच्या मागणीवर शिवसेना ठाम होती आणि याच मुद्यावरुन भाजपसोबत तिढा निर्माण झाला. अशात राज्यातील शिवसैनिकांसह पनवेलमधील शिवसेना महिला आघाडीच्या महिला शिवसैनिकांमध्ये धाकधूक होतीच. 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व घडामोडी पाहता एका ठिकाणी बसलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी पनवेलमधल्या जागृत मानल्या जाणाऱ्या हनुमान मंदिरात जाऊन या महिलांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. जर राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला तर याच गव्हाच्या कणकेत पंचामृत घालून त्या पिठाचे एक हजार दिवे लावू, असा नवस या महिलांनी केला. अखेर काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या महिलांचा हा नवस पूर्ण झाला आहे.

हा नवस फेडण्यासाठी पनवेल शिवसेना आघाडीच्या महिलांनी मंदिरात कणकेचे एक हजार दिवे लावून संकटमोचक हनुमानसमोर नतमस्तक झाल्या. या माध्यमातून शिवसैनिकांची निष्ठा आणि धर्मनिरपेक्षता याचा अनुभव अनेकांच्या लक्षात आलीच असेल. नवीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला.

Intro:सोबत चौपाल जोडला आहे.

पनवेल

शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा म्हणून पनवेलमधल्या महिलांनी चक्क संकटमोचक हनुमान मंदिरात नवस केला होता. हे सरकार पडल्यानंतरच अनवाणी पायानं चालत येऊन नवस फेडेल आणि मगच पायात चप्पल घालेल, असा नवस शेतकऱ्यानं केला होता. या महिलांचा हा नवस पूर्ण झाल्यानं आज पनवेल मधल्या हनुमान मंदिरात त्यांनी हा नवस फेडला.Body:राजकीय नेत्यांवर त्यांच्या समर्थकांची असलेली निष्ठा व त्या करिता काहीही करण्यास धजावणारे कार्यकर्ते आपल्याकडे नवीन नाही. अशीच एक काहीशी वेगळी घटना आज पनवेलमध्ये घडलीये. राज्यात सत्तास्थापन होत असताना समसमान वाटपाच्या मागणीवर शिवसेना ठाम होती आणि याच मुद्यावरुन भाजपसोबत तिढा निर्माण झाला. अशात राज्यातील शिवसैनिकांसह पनवेलमधील शिवसेना महिला आघाडीच्या महिला शिवसैनिकांमध्ये धाकधूक होतीच. 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व घडामोडी पाहता एका ठिकाणी बसलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी पनवेलमधल्या जागृत मानल्या जाणाऱ्या हनुमान मंदिरात जाऊन या महिलांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. जर राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला तर याच गव्हाच्या कणकेत पंचामृत घालून त्या पिठाचे एक हजार दिवे लावेल, असा नवस या महिलांनी केला. अखेर काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या महिलांचा हा नवस पूर्ण झालाय. Conclusion:हा नवस फेडण्यासाठी पनवेल शिवसेना आघाडीच्या महिलांनी मंदिरात कणकेचे एक हजार दिवे लावून संकटमोचक हनुमानसमोर नतमस्तक झाल्या. या माध्यमातून शिवसैनिकांची निष्ठा आणि धर्मनिरपेक्षता याचा अनुभव अनेकांच्या लक्षात आलीच असेल. नवीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला.

या महिलांशी बातचीत केलीये आमची प्रतिनिधी प्रमिला पवार हिने....
121- शिवसैनिक महिला
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.