ETV Bharat / state

जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे? पूरग्रस्त रायगडकरांना पडला प्रश्न - पालकमंत्री रवींद्र चव्हाण

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकुळ घातला आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी करोडोंची वित्तहानी झाली आहे. रायगडकरांना मदतीची गरज असताना, जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र जिल्ह्यात फिरकलेच नाहीत.

जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे? पूरग्रस्त रायगडकरांना पडला प्रश्न
author img

By

Published : Aug 8, 2019, 8:19 PM IST

रायगड - जिल्ह्यात आठवडाभरा पासून मुसळधार पाऊस व पुर परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासन सर्वत्र लक्ष ठेऊन काळजीपुर्वक परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्याचे पालक असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण, यांना मात्र जिल्ह्यातील पूर परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. रवींद्र चव्हाण अजूनही जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अशा वागण्यावर रायगडकर नाराजी व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे? पूरग्रस्त रायगडकरांना पडला प्रश्न
जिल्ह्यात 4 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात पेण, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, अलिबाग या तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली. पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, वाशी, बोर्जे, वढाव या गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते. शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले होते. जिल्हा प्रशासन व पेण प्रशासनातर्फे एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, स्थानिक संस्था याच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे.मुसळधार पावसाने अनेक भागांत दरडी कोसळल्या, घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी करोडोंची वित्तहानी झाली आहे.जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. एरवी पक्षाच्या राजकीय कामांसाठी चव्हाण जिल्ह्यात येतात. आत्ता जिल्ह्यात कठीण परिस्थिती उद्भवली असताना त्यांनी जिल्ह्यातील पूर भागाचा दौरा करून पाहणी करणे गरजेचे आहे.

Intro:जिल्ह्याचे पालकमंत्री गेले कुठे

जिल्ह्यात पूरस्थिती असतानाही पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष

रायगड : जिल्ह्यात आठवडा भरा पासून मुसळधार पाऊस व पुराच्या परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन परिस्थिती हाताळत आहेत. जिल्ह्याचे पालक असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मात्र जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत सोयर सुतक नसल्याचे दिसत असून अद्यापही जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या भूमिकेकडे रायगडकर नाराजी व्यक्त करीत आहेत. Body:जिल्ह्यात 4 ऑगस्ट पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात पेण, महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, अलिबाग या तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, वाशी, बोर्जे, वढाव या गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते. शेकडो नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले होते. जिल्हा प्रशासन व पेण प्रशासनातर्फे एन डी आर एफ, कोस्टल गार्ड, स्थानिक संस्था याच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.Conclusion:महाड, पोलादपूर या तालुक्यात पाच दिवसापासून पूरस्थिती असून याठिकाणच्या नागरिकांना एनडीआरएफ, सैन्य दल, कोस्टल पथकामार्फत सुरक्षित हलविण्यात आले. मुसळधार पावसाने अनेक भागात दरड कोसळली, घरांचे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून जाऊन भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी करोडच्या घरात वित्तहानी झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र जिल्ह्यात फिरकलेच नाही आहेत. एरव्ही पक्ष वाढीसाठी जिल्ह्यात येत असताना जिल्ह्यातील कठीण परिस्थिती उद्भवली असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूर भागाचा दौरा करून पाहणी करणे गरजेचे असताना त्यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रायगडकरामध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.