रायगड - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या वतीने यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला सुरवात केली आहे. जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः या अभियानात सहभागी झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाग्रस्ताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईत परतले असून सर्व गाव खेडी रिकामी झाली आहेत. गावातील नागरिकांची संख्या कमी होऊनही ग्रामीण भागात कोरोना वाढत चालला आहे. कोरोनावर त्वरित मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना आणली असून रायगड जिल्ह्यात पालकमंत्री घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत.
एखाद्या रुग्णाला जेव्हा समजत आपल्याला कोरोना झाला आहे. त्यावेळी तो रुग्ण घाबरतो त्याची शारीरिक परिस्थिती खालावते अशा वेळी रुग्णाने घाबरू नये याची जनजागृती या मोहिमेंतर्गत केली जात आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही आणि जाणवणार देखील नाही, असे आश्वासन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.
हेही वाचा - विजेचा लंपडाव : अलिबागमधील 14 सरपंचांचा महावितरण अधिकाऱ्याला घेराव