ETV Bharat / state

आधी मतदान मग विवाह...नवरदेव हळदीच्या अंगाने थेट मतदान केंद्रात - school

अजिंक्यने सर्व गोष्टी बाजूला ठेवत मतदान केले. मतदानाबद्दलची जागृती पाहुन अजिंक्यचे कौतुक केले जात आहे.

नवरदेव अजिंक्य डावलेकर
author img

By

Published : Apr 30, 2019, 9:45 AM IST

पनवेल - अंगाला हळद, पेहराव हळदीने माखलेला, डोक्यात हळदीची टोपी आणि कपाळावर बांधलेल्या रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या अशा अवस्थेत लोकशाहीतील मतदानाच्या कर्तव्याचा विसर पडू न देता मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमधल्या एका नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. अजिंक्य डावलेकर असे या नवरदेवाचे नाव आहे.

अजिंक्य पनवेलमधल्या खांदा कॉलनीत सेक्टर १ मधील सुयोग अपार्टमेंटमध्ये राहतो. अजिंक्य खांदा कॉलनीत महात्मा स्कूलइथल्या मतदान केंद्रावर पोहोचला. विवाह ३० तारखेला सकाळी असल्याने नातेवाईकांची घरात रेलचेल होती. तेवढ्यात अजिंक्यने सर्व गोष्टी बाजूला ठेवत मतदान केले. मतदानाबद्दलची जागृती पाहुन अजिंक्यचे कौतुक केले जात आहे. अजिंक्य ३० एप्रिल रोजी श्वेता नावाच्या मुलीसोबत विवाहबद्ध होणार आहे.

Intro:बातमीला फोटो सोबत जोडला आहे.

पनवेल

लग्न हा आयुष्यातील सर्वात सोनेरी क्षण! या क्षणाची उत्कंठा सर्वांनाच असते. मात्र या आनंदाच्या क्षणातही लोकशाहीतील मतदानाच्या कर्तव्याचा विसर न पडून देता हळदीच्या अंगाने मावळ मतदारसंघातील
पनवेलमधल्या एका नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. Body:अजिंक्य डावलेकर असं या नवरदेवाच नाव असून तो पनवेलमधल्या खांदा कॉलनीत सेक्टर 1 मधील सुयोग अपार्टमेंटमध्ये राहतो. अंगाला हळद, पेहराव हळदीने माखलेला, डोक्यात हळदीची टोपी व कपाळावर बांधलेल्या रूईच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधून अजिंक्य खांदा कॉलनीत महात्मा स्कुलइथल्या मतदान केंद्रावर पोहोचला. लग्न उद्या सकाळचे आसल्याने नातेवाईकांची रेलचेल असून तेवढ्यात नवरदेवाने सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रथम मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावणाऱ्या या नवरदेवाचे सर्वस्तरातून कौतुक केलं.
Conclusion:उद्या अजिंक्य हा श्वेता नावाच्या मुलीसोबत विवाहबद्ध होणार आहे. श्वेता हिच्यासोबत नवरा म्हणून असलेले सर्व कर्तव्य तो उद्यापासून पार पडणार असला तरी एक नागरिक म्हणून त्याने मतदान करून कर्तव्य पार पाडले, असं बोलून तेथील मतदान केंद्रावर सदानंद शिर्के आणि अर्चना क्षीरसागर यांनी देखील त्याच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.