ETV Bharat / state

रायगड : खालापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील बोकड झाले गायब? - रायगड खालापूर लेटेस्ट क्राईम न्यूज

या संदर्भात खाटीक महेंद्र नकाते यांनी सांगितले की, या प्रकरणात काही तरी काळबेरे दिसत आहे. अशा प्रकारच्या घटना राजस्थानात होत असत. त्यातून बोकड गायब करून फसवणूकीचे प्रकार होत असत. हेच लोण आता हळूहळू महाराष्ट्रात पसरू पहात आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच या प्रकरणात छडा लावून खाटीकांची होणारी फसवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

खालापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील बोकड झाले गायब

author img

By

Published : Feb 4, 2021, 1:14 PM IST

खालापूर (रायगड) - खालापूर ठाण्यातील पोलिसांनी जप्त केलेल्या बोकड प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्षात 269 पैकी 43 बोकडच दिसल्याने खाटीक हवालदिल झाले आहेत. तब्बल 226 बोकड गायब झाल्याने आता काय करायचे, असा मोठा प्रश्‍न खाटीकांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणात काहीतरी काळबेरे असल्याचा संशय खाटीकाने व्यक्त करीत पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे.

पोलिसांनी 269 बोकड घेतले ताब्यात, दोनच दिवसांत राहिले फक्त 43 बोकड

प्राणी मित्रांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी वाहतूक होत असलेल्या खाटीकांच्या मालकीचे बोकडांचे वाहन अडवून त्यातील 269 बोकड ताब्यात घेतले. मात्र, खालापूर न्यायालयाने या खटल्यासंदर्भात आदेश देत मुद्देमाल खाटीक अय्याज कुरेशी यांच्या ताब्यात देण्यास सांगितले. प्रत्यक्षात मात्र बोकड ताब्यात देण्यास वेगवेगळ्या कारणाने टाळाटाळ केली जाऊ लागली. त्यामुळे खाटीकांनी निदान आमचे बोकड कशा अवस्थेत आहेत, हे तरी दाखवा, असे सांगितल्यानंतर ते ठेवण्यात आलेल्या गोट फार्ममध्ये दाखवलेले बोकड मोजताना ते अवघे 43 असल्याचे दिसले. यामुळे धक्का बसल्याने खाटीक कुरेशी यांनी आमचे सर्वच्या सर्व बोकड देण्याची मागणी लावून धरली. यावर वेगळेच बोकड ताब्यात देण्याचा प्रयत्न गोट फार्ममधून करण्यात आला. मात्र, आमच्या खुणा असलेलेच बोकड हवेत, हा हट्ट खाटीकांनी धरल्यानंतर मात्र वेळ लांबवत नेऊन गोट फार्म चालकाने पनवेल न्यायालयातून स्टे मिळवित अव्वाच्या सव्वा खर्चाची मागणी केली. या प्रकारामुळे हादरलेल्या खाटीकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करीत बोकड परत देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - सांगलीचा १६ लाखांचा बोकड चोरट्यांनी अलिशान कारमधून पळवला

बोकडांच्या दोन दिवसांच्या खाण्या-पिण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी

या प्रकरणी खालापूर पोलिसांनी जप्त केलेल्या शेळया-मेंढया ठेवण्याची व्यवस्था नव्हती. ज्या गोट फार्ममध्ये त्या ठेवण्यात आल्या होत्या, तिथेही पुरेशी जागाही नव्हती. तसेच, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच खाण्याचीही व्यवस्था देखील नसताना बोकड ताब्यात देताना गोट फार्मने न्यायालयाच्या आदेशाविरोधात धाव घेत बोकड परत देताना त्यासाठी खाण्या-पिण्यासाठी आलेला तब्बल 5 लाख रुपयांचा खर्च देण्याची मागणी केली आहे. ही अजब मागणी पाहून खाटीक अय्याज कुरेशी हैराण झाले आहेत. दोन दिवसांत खाण्याचा खर्च इतका कसा होऊ शकतो, असा त्यांचा प्रश्‍न आहे.

बोकड गायब करून फसवणुकीचा प्रकार?

या संदर्भात खाटीक महेंद्र नकाते यांनी सांगितले की, या प्रकरणात काही तरी काळबेरे दिसत आहे. अशा प्रकारच्या घटना राजस्थानात होत असत. त्यातून बोकड गायब करून फसवणूकीचे प्रकार होत असत. हेच लोण आता हळूहळू महाराष्ट्रात पसरू पहात आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच या प्रकरणात छडा लावून खाटीकांची होणारी फसवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणात गोट फार्म मालकाने कोर्टाकडून स्थगिती आणली असून त्यावर निकाल लागल्यानंतर त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पळा... पळा.. बोकड आला! कोल्हापूरात लक्ष्मी देवाच्या बोकडाची दहशत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.