ETV Bharat / state

फेसबुकच्या मैत्रीतून मुलीची फसवणूक, सीए समजून प्रेम केले तो निघाला कपड्याच्या दुकानातील कामगार

कांदिवली येथील पीडित मुलीचे फेसबुकच्या माध्यमातून एकाशी मैत्री होऊन नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्याने आपण सीए असल्याचे सांगून पीडितेची फसवणूक केली. यानंतर ४ वर्षे आरोपीने फिर्यादी विद्यार्थिनीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा अलिबाग येथे येऊन पीडित तरुणीला भेटतही होता. मात्र, त्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडितेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फेसबूकच्या मैत्रीतून मुलीची फसवणूक
फेसबूकच्या मैत्रीतून मुलीची फसवणूक
author img

By

Published : Feb 18, 2020, 11:15 PM IST

रायगड - फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन फसवणूक झाल्याच्या घटना दिवसागणिक घडत असतात. अशीच एक घटना अलिबागमधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजात बीएचएमएसच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत घडली आहे. विशेष म्हणजे प्रेमी हा सीए असल्याची बतावणी करीत असून मुळात एका कपड्याच्या दुकानात काम करीत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फेसबूकच्या मैत्रीतून मुलीची फसवणूक

पीडित विद्यार्थिनी ही कांदिवली येथील राहिवासी असून अलिबाग मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बीएचएमएस पदवीच्या शेवटच्या वर्षाला ती शिक्षण घेत आहे. तर, फिर्यादी विद्यार्थिनीला फसविणारा आरोपी तरुण हा सुद्धा चारकोप, कांदिवली येथे राहतो. ४ वर्षांपूर्वी पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची १ ऑक्टोबर २०१७ पासून फेसबुकवर मैत्री झाली. आरोपीने आपण सीए असल्याचे पीडित विद्यार्थिनीस सांगितले होते. त्यानंतर मैत्री होऊन त्यांचे प्रेमही जुळले. यानंतर ४ वर्षे आरोपीने फिर्यादी विद्यार्थिनीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा अलिबाग येथे येऊन पीडित तरुणीला भेटतही होता.

हेही वाचा - कर्नाळा बँकेचे संचालक माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह 76 जणांवर गुन्हा दाखल

पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपी टाळाटाळ करत होता. यावर तिने चौकशी केली असता आरोपी हा सीए नसून एका कपड्याच्या दुकानात कामाला असून विवाहित असल्याचे कळले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपली फसगत झाल्याचे समजल्यानंतर अलिबाग पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलिबाग पोलीस या प्रकरणाबाबत अधिक तपास करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - '' तान्हाजी यांच्या सारख्या मावळ्यांचा इतिहास जपणे सुद्धा महत्वाचे''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.