ETV Bharat / state

Raigad Crime News : घोडीवलीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडले; 4 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा - घोडीवलीत चोरट्यांनी घर फोडले

घोडीवली येथील एक घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडून चोरट्याने साडेतीन लाखाचे सोने व 40 हजाराची रोखड, असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला ( Thieves Stols Gold And Cash In Ghodiwali ) आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Case Register Khalapur Police Station ) करण्यात आला आहे.

thieves stols gold and cash
thieves stols gold and cash
author img

By

Published : Mar 30, 2022, 5:44 PM IST

खालापूर (जि.रायगड) - घोडीवली येथील एक घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडून चोरट्याने साडेतीन लाखाचे सोने व 40 हजाराची रोखड, असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला ( Thieves Stols Gold And Cash In Ghodiwali ) आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल करून तात्काळ ( Case Register Khalapur Police Station ) तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नावढे ग्राम पंचयत हद्दीत घोडीवली येथील मनोहर गोटीराम काठवले पत्नी आई आणि दोन मुली यांच्यासमवेत राहतात. सोमवारी 28 तारखेला रात्री गाड झोपेत असताना रात्री 2 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा मागच्या दार उघडून घरात हलक्या पावलांनी घरात प्रवेश केला. तेव्हा कपाट खोलून तिजोरीच्या चाव्या मिळवून त्यांच्यातील 3 तोळ्यांची गठन, दोन चैनी, दोन कानातील सेट, अंगठी, पैंजण सात जोड, रोख 40 हजार, असा एकूण जवळपास 4 लाखाचा ऐवज लंपास केला. सकाळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याने सर्वजण हादरले. त्यामुळे कपाट तपासले असता त्यातील सर्व सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्या घरात जर सोन्या चांदी सारखे वस्तू असतील तर सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी व्यक्त केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा - Rajesh Tope on Mask Free Maharashtra : राज्यात मास्क मुक्तीबाबत तूर्तास निर्णय नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.