रायगड: जेएनपीटी बंदरातून (JNPT port) होणाऱ्या आयात निर्यातीच्या माध्यमातून अनेकदा तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. (JNPT port smuggling). आता पुन्हा एकदा घरगुती सामानाच्या कंटेनरमधून प्राण्यांची कातडी आणि प्रसिद्ध चित्रकारांची कोट्यवधींची दुर्मिळ चित्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
![JNPT port smuggling](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-02-jnptsmuggling-slug-mhc1008_09112022145414_0911f_1667985854_768.jpg)
सीमाशुल्क विभागाची तपास मोहीम: जेएनपीटी बंदरात तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून न्हावा शेवा सीमा शुल्क विभागाचेही या तस्करांकडे बारीक लक्ष असते. सीमा शुल्क विभागाने केलेल्या २ तपासणी मोहिमेत ३ कोटींच्या ३२ मेट्रिक टन फळांच्या साठ्यासह अघोषित मौल्यवान कलाकृती, प्राण्यांचे कातडे असा करोडोंचा माल न्हावा शेवा सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्य्राची कातडी, अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ कलाकृती, लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची ३८ दुर्मीळ चित्रे, असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या सर्वांची किंमत करोडोंच्या घरात आहे. एक दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या १७७ मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत ३ कोटी रुपये मूल्याचे ३२ मेट्रिक टन नेकट्रराईन फळ आढळले. तर मंगळवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने कंटेनरची तपासणी केली. कागदोपत्री घरगुती वस्तू असल्याचे नमूद होते मात्र, प्रत्यक्षात दुर्मिळ वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.
![JNPT port smuggling](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-02-jnptsmuggling-slug-mhc1008_09112022145414_0911f_1667985854_394.jpg)
अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी होत असतानाही होते आहे तस्करी: जेएनपीटी बंदरातून या आधी सुद्धा अनेकदा तस्करीचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये अमली पदार्थ, लाल चंदन, हत्यारे, सोनं, चांदी याचप्रमाणे प्राण्यांच्या कातडीचे तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कंटेनर तपासणी होत असतानाही अशा प्रकारची तस्करी आजही होत म्हणजेच आजही जेएनपीटी बंदरामध्ये तस्करांच्या टोळ्या कार्यरत आहे हे समोर येत आहे. यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेमध्ये अधिक सटीकता येणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
![JNPT port smuggling](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-02-jnptsmuggling-slug-mhc1008_09112022145414_0911f_1667985854_813.jpg)