ETV Bharat / state

कर्जतमधील गजानन डुकरे यांनी सायकलवरून 90 किमी अंतर केले 3 तासात पार - गजानन डुकरे सायकलिंग न्यूज

कर्जत तालुक्यात नेरळ येथील व्यवसायाने वकील असलेले अ‌ॅ‌ड. गजानन डुकरे यांनी सायकलवर 90 किलोमीटर अंतर अवघे 3 तास 28 मिनिटात पार केले.

Gajanan Dukare
गजानन डुकरे
author img

By

Published : Mar 23, 2021, 8:36 PM IST

Updated : Mar 23, 2021, 9:27 PM IST

खालापूर(रायगड) - कर्जत तालुक्यात नेरळ येथील व्यवसायाने वकील असलेले अ‌ॅ‌ड. गजानन डुकरे यांनी सायकलवर 90 किलोमीटर अंतर अवघे 3 तास 28 मिनिटात पार केले. यानंतर सायकलिंग स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्यांदा डुकरे यांनी आंतरराष्ट्रीय विक्रम केला आहे.

गजानन डुकरे यांनी सायकलवरून 90 किमी अंतर केले 3 तासात पार

दुसऱ्यांदा अ‌ॅड. डुकरे यांनी केला आंतरराष्ट्रीय विक्रम

सायकलिंग राजगुरू भगत सिंग, सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट मध्ये भारतातून भाग घेऊन त्यांनी हा दुसरा विक्रम केला आहे. डुकरे यांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

हेही वाचा - ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप

अ‌ॅड.डुकरे यांच्या कामगिरीने जागतिक स्तरावर कर्जत तालुक्याचे नाव उंचावले

अ‌ॅड.गजानन डुकरे यांनी 21 मार्च रोजी सायकलिंग राजगुरू भगत सिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट मध्ये भारताकडून भाग घेतला होता. 90 किलोमीटरचे अंतर केवळ 3 तास 28 मिनिटामध्ये पूर्ण करून त्यांनी कर्जत तालुक्याचे आणि रायगड जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावले आहे.

राजगुरू भगत सिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट राईडचे वैशिष्ट्य म्हणजे 90 किमी राईड आपला तिरंगा झेंडा सायकलवर फडकवत पूर्ण करायची होती. त्यासाठी दिलेल्या वेळेपेक्षा पण कमी वेळेत म्हणजे 10 तासाची राईड अवघ्या 3 तास 28 मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्यांच्या सार्थ कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या आधीही त्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सायकलवर तिरंगा झेंडा लावून 72 किलोमीटरचे अंतर पावणे तीन तासात पूर्ण केले होते. त्यावेळी अ‌ॅड गजानन डुकरे यांनी 400 हून अधिक सायकल पट्टूमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला होता.

हेही वाचा - मुंबईत मंगळवारी 3512 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 8 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 23, 2021, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.