ETV Bharat / state

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. माथेरानच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते पाणी गाढी नदीत वाहून आले आहे.

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:55 PM IST

रायगड - संततधार पावसामुळे पनवेल शहरातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गाढी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. माथेरानच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते पाणी गाढी नदीत वाहून आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी या गाढी नदीत जमा होत असल्याने आता गाढी नदी ओसंडून वाहू लागली आहे. पावसाच्या रुद्रावतारामुळे अनेकांनी घरातून बाहेर न पाडण्याचाच निर्णय घेतला.

पनवेलमधील गाढी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना घरातील वीज पुरवठा बंद ठेवून, गरज असेल तरच बाहेर पडण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे.

Intro:सोबत व्हिडीओ जोडला आहे

पनवेल

संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल शहरातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गाढी नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Body:
गेल्या तीन दिवसापासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल शहराला झोडपून काढलंय. ठिकठिकाणी गुडघाभर इतकं पाणी साचालय. माथेरानच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते पाणी गाढी नदीत वाहून आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी या गाढी नदीत जमा होत असल्याने आता गाढी नदी ओसंडून वाहू लागली आहे. पावसाच्या रुद्रावतारामुळे अनेकांनी घरातून बाहेर न पाडण्याचाच निर्णय घेतला. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला.
Conclusion:करंजाडे पुलाखालून गाढी नदी जोरदार वाहत आहे. असाच पाऊस राहिल्यास गाढी नदी धोक्याची पातळी गाठेल, अशी भीती आहे. याचबरोबर घरातली वीज पुरवठा बंद ठेवून, गरज असेल तरच बाहेर पडण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.