ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर केलेले 'विराट' आरोप खोटे, माजी नौदल प्रमुखांचा खुलासा - भायमळा

लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याने खळबळ उडाली आहे.

माजी नौदल प्रमुख एल. रामदास
author img

By

Published : May 10, 2019, 1:38 PM IST

रायगड - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी केलेले हे आरोप खोटे असल्याचा खुलासा माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.

माजी नौदल प्रमुख एल. रामदास

लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात जाहीर सभा सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर विराट आयएनएस या युद्धनौकेचा कौटुंबिक सहलीसाठी वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशभरात खळबळ माजली आहे.

माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. लक्षद्वीप बेटावर राजीव गांधी हे बेट विकासाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी उपस्थित होत्या. इतर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले. सेनेला राजकारणात ओढू नये, असे निवडणूक आयोगाला आपण कळवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजीव गांधी हे पंतप्रधान असताना आयएनएस विराट युद्धनौका ही आपल्या नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासाठी वापरायचे. गांधी कुटुंबियांनी आपल्या खासगी वापरासाठी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील रामलीला मैदानावरील प्रचार सभेत केला.

राजीव गांधी हे १० दिवस सुट्टी घालवण्यासाठी कुटुंबियांसोबत गेले होते. त्यावेळी त्यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबियांना फिरवण्यासाठी केला. आयएनएस विराट ही युद्धनौका गांधी कुटुंबियांना घेऊन एक बेटावर १० थांबली होती.

गांधी कुटुंब ज्या बेटावर गेले होते. तिथे त्यांची सेवा करण्याचे काम लष्कर व सरकारने केले होते. यासाठी विशेष हेलिकॉप्टरसुध्दा वापरण्यात आला होता. प्रशासनानेच याचे नियोजन केले होते. जेव्हा एक कुटुंब सर्वोच्च होते, तेव्हा देशाची सुरक्षा धोक्यात येते, असेही मोदी म्हणाले.

Intro:Body:

पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर केलेले 'विराट' आरोप खोटे, माजी नौदल प्रमुखांचा खुलासा

रायगड - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी केलेले हे आरोप खोटे असल्याचा खुलासा माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात जाहीर सभा सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर विराट आयएनएस या युद्धनौकेचा कौटुंबिक सहलीसाठी वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशभरात खळबळ माजली आहे.

माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. लक्षद्वीप बेटावर राजीव गांधी हे बेट विकासाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी उपस्थित होत्या. इतर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले.

सेनेला राजकारणात ओढू नये, असे निवडणूक आयोगाला आपण कळवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.