ETV Bharat / state

Forest resources: वणवे लागायला सुरुवात; वन्यजीव, वनसंपदा धोक्यात - उरण तालुक्यामध्ये वणवे

उरण तालुक्यामध्ये वणवे लागायला सुरुवात झाली आहे. या वणव्यांमुळे वन्यजीव धोक्यात येत असून, निसर्गाचीही मोठ्या प्रमाणात हाणी होत आहे. सध्या नैसर्गिक वणव्यांपेक्षा जाणूनबुजून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. वन्यजीवांची शिकार, अवैद्य धंदे, अतिक्रमणे अशा गोष्टींसाठी वणवे पेटवण्यात येत आहेत.

जंगल
जंगल
author img

By

Published : Nov 10, 2022, 4:18 PM IST

रायगड - उरणमध्ये मोरा मार्गालगत नौदलाच्या शास्त्रागाराला लागून असणाऱ्या डोंगरावर वणवा लागून मोठा परिसर जाळून खाक झाला आहे. या वणव्यामुळे येथे असणारे वन्यजीव तसेच वन्य वनस्पतींची मोठी हाणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे नैसर्गिकरित्या लागणाऱ्या वणव्यांपेक्षा स्वार्थापोटी वणवे लावण्यात येत असल्याचे दिसून येते. उरण ग्रामीण भागाला मोठा डोंगरभाग आणि वनसंपदा लाभली आहे. मात्र, येथील जंगल भागामध्ये आजवर अनेक वन्यजीव पकडण्यासाठी लावण्यात येणारा फास आढळून आले आहेत.

वनस्पतींचे मोठे नुकसान - वन्यजीव शिकाऱ्यांकडून प्राण्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर फास लावून, इतर भागाला आग लावण्यात येते. जेणेकरून हे प्राणी त्यांच्या मार्गाने पळत येऊन या फासामध्ये अडकतील. तर अवैद्य धंदे करण्यासाठीही काही ठिकाणी आग लावून वन्यजागा मोकळ्या करण्यात येतात. अतिक्रमणधारकही अशाप्रकारची आग लावून निघून जातात. मग याचे रूपांतर वणव्यात होते. या सर्व गोष्टींमुळे मात्र वन्यजीव आणि वनस्पतींचे मोठे नुकसान होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहे. तर, काही निसर्ग संवर्धन संस्था अशा वनव्यांपासून वनसंपदा सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, पावसाळ्यात वनीकरण केलेल्या झाडांना पावसाळ्यानंतर लागणाऱ्या वणव्यामुळे वाचवणे फार कठीण होत आहे. यामुळे अशा संस्थानीं पर्यावरणासाठी घेतलेली मेहनत देखील फोल ठरत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष का? जनतेचा सवाल - सरकार " झाडे लावा झाडे जगवा " या घोषवाक्याखाली मोठा निधी खर्च करून, वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून वनीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वृक्षारोपणानंतर ही झाडे जगतात की मारतात याकडे का? पाहत नाही असा सवाल निर्माण होत आहे. तर अशाप्रकारे केलेले वनीकरण नेहमीच वणव्यांच्या भक्षस्थानी पडून नष्ट होत आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असाही सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.